हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Kia Carens Clavis EV । एकीकडे संपूर्ण भारतात टेस्लाच्या च्या इलेक्ट्रिक कार शोरुमची चर्चा असताना दुसरीकडे दक्षिण कोरियाची कार निर्माता कंपनी Kia ने भारतीय बाजारात आपली नवीन इलेक्ट्रिक कार लाँच केली आहे. Kia Carens Clavis EV असं या इलेक्ट्रिक कारचे नाव असून हि एक ७ सीटर MPV कार आहे. या इलेक्ट्रिक कारची सुरुवातीची किंमत १७.९९ लाख रुपये असून टॉप मॉडेल साठी ग्राहकांना २४.४९ लाख रुपये मोजावे लागतील. फॅमिलीसाठी हि कार म्हणजे सर्वात बेस्ट पर्याय मानला जात आहे. आज आपण या गाडीचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि रेंज याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
लूक आणि डिझाइनच्या बाबतीत सांगायचं झाल्यास, Kia ची हि इलेक्ट्रिक कार (Kia Carens Clavis EV ) यापूर्वी लाँच झालेल्या पेट्रोल- डिझेल वाहनासारखीच दिसते. यात समोरील बाजूला आइस-क्यूब पॅटर्न असलेले हेडलाइट्स आणि स्लिम एलईडी लाईट बघायला मिळतात. तसेच नवीन ICE-क्यूब्ड LED फॉग लॅम्प आणि खालच्या बंपरवर एक नवीन सिल्व्हर ट्रिम देखील आहे. गाडीचे चार्जिंग पोर्ट MPV कारच्या पुढच्या बाजूला तुम्हाला दिसेल. गाडीच्या केबिनमध्ये १२.३-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम आणि १२.३-इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्लेसह ड्युअल-स्क्रीन सेटअप आहे.
बॅटरी आणि रेंज – Kia Carens Clavis EV
Kia च्या या इलेक्ट्रिक कारला २ बॅटरी पॅकचा पर्याय दिला जात आहे. यातील एक बॅटरी पॅक 42kWh युनिट असून ती 404 किलोमीटर रेंज देते, तर दुसरा बॅटरी पॅक 51.4kWh युनिटचा असून यामाध्यमातून कियाची कार तब्बल 490 किलोमीटर पर्यंत अंतर आरामात पार करू शकते. कंपनीचा दावा आहे कि हि इलेक्ट्रिक कार फक्त ३९ मिनिटांत १०% ते ८०% पर्यंत चार्ज होते, आणि अवघ्या ८.४ सेकंदात ०-१०० किमी/ताशी वेग पकडते. कार मध्ये ४-लेव्हल रिजनरेटिव्ह ब्रेकिंग आणि स्टीअरिंग कॉलम-माउंटेड ड्राइव्ह सिलेक्टर देखील आहे. ज्याच्या मदतीने वेगवेगळ्या रस्त्यांच्या परिस्थितीनुसार ड्रायव्हिंग मोड चेंज करू शकता.
अन्य फीचर्स –
अन्य फीचर्सबाबत सांगायचं झाल्यास किया च्या इलेक्ट्रिक कार मध्ये (Kia Carens Clavis EV ) व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, वायरलेस अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो, पॅनोरॅमिक सनरूफ, प्रीमियम बोस साउंड सिस्टम, ४-वे इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, ६ एअरबॅग्ज, फ्रंट आणि रियर डिस्क ब्रेक, ट्रॅक्शन कंट्रोल, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्युशन (EBD), इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल (ESC), हिल-स्टार्ट असिस्ट, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम यांसारखी फीचर्स मिळतात.




