Kia Carens CNG : कियाची कॅरेन्स लवकरच येणार सीएनजी मध्ये; Ertiga ला देणार तगडी फाईट

Kia Carens CNG
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अलीकडच्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्याने अनेक लोकांचा कल CNG गाडी खरेदी करण्याकडे वळला आहे . भारतात Tata Motors, Mahindra, Hyundai Motors आणि MG Motor तसेच Jeep यासह इतर अनेक कंपन्यांनी मध्यम आकाराच्या SUV गाड्यांची निर्मिती केली आहे. तसेच लोकांचा कल CNG कडे असल्याने त्यांची विक्रीही चांगली होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर किआ मोटर्सने लाँच केलेल्या ७ सीटर MPV कारन्सच्या सीएनजी (Kia Carens CNG) व्हेरियंटची टेस्टिंग सुरू केली आहे. बेस्ट सेलिंग कार अर्टिगा सीएनजीला टक्कर देण्यासाठी किआ कारन्स लवकरच ही कार लाँच करणार आहे.

Kia Carens CNG

अहवालानुसार, Kia 1.4 लीटर टर्बोचार्ज्ड इंजिनवर CNG किटची टेस्टिंग करत आहे. जे १४० पीएसचे पॉवर आणि २४२ न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करण्यात सक्षम आहे. Kia मध्ये (Kia Carens CNG) टर्बो पेट्रोल इंजिन व्यतिरिक्त 1.5 लीटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल आणि 1.5 लीटर टर्बो डिझेल इंजिन देण्यात आले आहे.Kia Carens ही टर्बो पेट्रोल इंजिनसह CNG असलेली पहिली कार बनणार आहे. सध्या ही 7 सीटर कार 7 स्पीड DCT ट्रान्समिशन ऑप्शनमध्येही उपलब्ध आहे. Kia Carens चा लूक आणि फीचर्स अप्रतिम असून कारची किंमत कमी असल्याने लोकांच्या पसंतीस उतरत आहे.

Kia Carens CNG

पहा अर्टिगा और कारेन्सच्या किमती (Kia Carens CNG)

Kia Motors ने त्‍याची Dhansu MPV Kia Carens 6 आणि 7 सीटर ऑप्‍शनमध्‍ये सादर केली आहे, ज्याच्‍या किमती रु. 9.59 लाख ते रु. 17.70 लाखांपर्यंत आहेत. त्याच वेळी, कार्नेसची सर्वात मोठी प्रतिस्पर्धी असेलेली मारुती एर्टिगाची किंमत 8.35 लाख ते 12.79 लाख रुपये आहे. लॉन्च झाल्यापासून केरेन्सने एर्टिगाचे मार्केट खराब केले आहे. Ertiga CNG विक्रीवर परिणाम करण्यासाठी Carrens CNG ची (Kia Carens CNG) किंमत रु. 12 लाखाहून अधिक केली जाईल असे मानले जाते.

हे पण वाचा:

Mahindra Bolero : दमदार इंजिन अन् ड्युअल एअरबॅगची सिस्टीम; महिंद्राची नवी बुलेरो पहाच….