इस्लामपूर । राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंत पाटील सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. आपल्या दैनंदिन दिनचर्येतील बऱ्याचं गोष्टी, प्रसंग ते आपल्या सोशल मीडिया अकॉउंटवर शेअर करत असतात. आपल्या इस्लामपूर मतदारसंघाचा दौरा करताना असाच एक गोड प्रसंग जयंत पाटील यांनी आपल्या सोशल मीडिया अकॉउंटवर शेअर केलाय. जयंत पाटील यांनी एका चिमुकल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे.
या व्हिडिओत एक चिमुकला जयंत पाटील यांना आग्रह करत त्यांचा फोटो काढताना दिसत आहे. जयंत पाटीलही त्या चिमुकल्या फोटोग्राफरला प्रतिसाद देत फोटो काढून घेताना दिसतआहेत. याशिवाय व्हिडिओच्या शेवटी हा चिमुकल्याने स्वतःहून एका दमात मंगलाष्टक जयंत पाटलांना म्हणून दाखवले. यानंतर जयंत पाटलांनी अगदी प्रेमाने त्याला जवळ घेत त्याचे कौतुक केलं.
जयंत पाटील यांनी या प्रसंगाचा व्हिडिओ शेअर करताना लिहलं कि,” आज मतदारसंघात नवेखेड येथे दौऱ्यावर असताना रुद्र जंगम हा मुलगा अचानक समोर आला आणि त्याने ‘मला तुमचा फोटो काढायचा आहे‘ अशी विनंती केली. त्याने माझा फोटो काढला आणि फोटो काढून झाल्यावर अगदी स्वतःहून कवितेप्रमाणे तोंडपाठ असलेले मंगलाष्टक देखील म्हणून दाखवले!” सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
आज मतदारसंघात नवेखेड येथे दौऱ्यावर असताना रुद्र जंगम हा मुलगा अचानक समोर आला आणि त्याने ‘मला तुमचा फोटो काढायचा आहे‘ अशी विनंती केली. त्याने माझा फोटो काढला आणि फोटो काढून झाल्यावर अगदी स्वतःहून कवितेप्रमाणे तोंडपाठ असलेले मंगलाष्टक देखील म्हणून दाखवले ! pic.twitter.com/1L7zdYSelt
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) December 20, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’