व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

साताऱ्यातून काॅलेजच्या दोन युवतीचे अपहरण, पालकांची पोलिसाकडे धाव

सातारा | सातारा शहरातील महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरुन दोन युवतींचे अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे. संबंधित मुलीच्या नातेवाईकांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी अज्ञातावर अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. मात्र, या घटनेमुळे सातारा शहरात खळबळ उडाली आहे.

साताऱ्यातील एका महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारा समोरून एक महाविद्यालयीन युवती गायब झाली आहे. ही युवती तिच्या मैत्रिणीच्या वाढदिवसाला जाते असे सांगून गेली आहे. मात्र ती परत न आल्याने तिच्या पालकांनी तिच्या फोनवर फोन केला. त्यावेळी ही मुलगी अज्ञात युवकासोबत असल्याचे समोर आले. त्यानंतर मुलीच्या आईने यासंदर्भात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

दुसरी घटनाही साताऱ्यातील महाविद्यालयाच्या परिसरात घडली आहे. 16 वर्षाची अल्पवयीन मुलगी कॉलेजला गेली होती. काॅलेजला गेलेली अल्पवयीन मुलगीही कॉलेजच्या परिसरातून गायब झाली असल्याचे मुलीच्या आईने तक्रारीत म्हटले आहे. या दोन्ही प्रकरणाचा सातारा शहर पोलीस तपास करत असून मुलींचे मोबाईल लोकेशन तपासले जात आहे. त्यानंतरच मुली नेमक्या कुठे आहेत हे समोर येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.