हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा दुखापतीमुळे आयपीएलमधील मागील चार सामने खेळलेला नाही. मुंबईच्या चाहत्यांसाठी हा खूप मोठा धक्का आहे. रोहीतच्या अनुपस्थितीत आक्रमक फलंदाज कायरन पोलार्ड संघाचं नेतृत्व करत आहे. रोहितच्या अनुपस्थितीतही संघ चांगल्या स्थितीत असून मुंबईचा संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरला आहे. तरिही रोहित कधी मैदानावर दिसणार असा प्रश्न त्याच्या चाहत्यांच्या मनात आहे. याबाबत संघाचा कायरन पोलार्डने मोठं वक्तव्य केलं आहे.
रोहितच्या कमबॅकबाबत पोलार्ड म्हणाला की, रोहित त्याच्या दुखापतीमधून सावरतोय, लवकरच तो संघात कमबॅक करेल. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यानंतर पोलार्ड समलोचकांशी बोलत होता. किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यादरम्यान रोहितच्या डाव्या पायाचे स्नायू दुखावले गेले होते. त्यातूनत रोहित आता सावरतोय.
मुंबई इंडिअन्स सध्या सुपर फॉर्मात असून गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. तरीही रोहित शर्मा संघात परतणे मुंबई साठी खूप गरजेचं आहे. कारण प्ले ऑफ सामन्यासाठी रोहित चा अनुभव संघासाठी कामी येणार आहे.रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडिअन्सने आत्तापर्यंत तब्बल 4 वेळा आयपीएल चषक जिंकला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’