Kinetic E-Luna : भारतात सध्या इलेक्ट्रिक गाड्यांची चांगलीच चलती आहे. पेट्रोलचा खर्च वाचवण्यासाठी इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करण्याला ग्राहक पसंती दाखवत आहेत. त्यामुळे वाढती मागणी पाहता अनेक वाहन उत्पादक कंपन्या आपल्या गाड्या इलेक्ट्रिक व्हर्जन मध्ये बाजारात आणत आहेत. तुम्ही Luna गाडी तर बघितलीच असेल, आता हीच Luna सुद्धा आता इलेक्ट्रिक मध्ये आली आहे. इलेक्ट्रिक वाहन निर्मिती कंपनी कायनेटिक ग्रीनने भारतीय मार्केट मध्ये E-Luna लाँच केली आहे. या गाडीची किंमत फक्त ७० हजार रुपये असून चालवायला अतिशय परवडणारी अशी कि इलेक्ट्रिक गाडी आहे. आज आपण या E-Luna चे खास फीचर्स जाणून घेऊयात…..
110 KM रेंज –
कंपनीने या Kinetic E-Luna मध्ये 2kwh लिथियम आयन बॅटरी आणि 1.2kw मोटर दिली आहे. येत्या काळात कंपनी या गाडीमध्ये 3 kwh बॅटरी पॅक सुद्धा बसवणार आहे. यामध्ये देण्यात आलेली बॅटरी फुल्ल चार्ज करण्यासाठी 4 तास वेळ लागतो. परंतु, एकदा पूर्णपणे चार्ज केल्यानंतर ही इलेक्ट्रिक लुना तब्बल 110 किलोमीटर पर्यंत अंतर आरामात पार करू शकते. यावेळी तिचे टॉप स्पीड 50 किमी प्रतितास इतकं राहील. या इलेक्ट्रिक लुनाचे वजन 96 किलो असून ती 50 किलोपर्यंत सामान लोड करण्यास सक्षम आहे असा दावाही कंपनीने केला आहे.
फीचर्स- Kinetic E-Luna
गाडीच्या फीचर्सबाबत सांगायचं झालयास, या Kinetic E-Luna मध्ये डिजिटल मीटर, साइड स्टँड सेन्सर, स्टील चेसिस, सेक्युरिटी लॉक, 16 इंच चाके, यूएसबी चार्जिंग पॉइंट, हाय फोकल हेडलाइट, मोठी कॅरींग स्पेस, कॉम्बी ब्रेकिंग सिस्टीम, फ्रंट लेग गार्ड यासारखे फीचर्स देण्यात आलेले आहेत.
किंमत किती?
Kinetic E-Luna ची एक्स-शोरूम किंमत 69,990 रुपये आहे. कंपनीने ही इलेक्ट्रिक लुना हिरवा, काळा, लाल, पिवळा आणि निळा या ५ रंगात उपलब्ध केली आहे. ही इलेक्ट्रिक लुना ११० किलोमीटर रेंज देत असल्याने तिला महिनाभर जर वापरलं तर चार्जिंगचा खर्च अवघा २५० रुपयांपर्यंत येऊ शकतो, म्हणजेच दिवसाला तुम्हाला जास्तीत जास्त १० रुपये खर्च पडेल. त्यामुळे ही इलेक्ट्रिक लुना अतिशय परवडणारी अशी गाडी म्हणावी लागेल. तुम्ही कंपनीच्या वेबसाइटवरून फक्त 500 रुपयांमध्ये बुक करू शकता. लवकरच कंपनी या गाडीची डिलिव्हरी सुरू करेल.