Thursday, March 30, 2023

किंग्स इलेव्हन पंजाबचा कर्णधार करतोय कसून सराव…. व्हिडिओ वायरल

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय संघाचा आक्रमक फलंदाज लोकेश राहुल आयपीएलसाठी सज्ज झाला आहे. लोकेश राहुल यावर्षी किंग्स इलेव्हन पंजाबच नेतृत्व करताना दिसेल.लोकेश राहुल प्रथमच एका आयपीएल संघाचं नेतृत्व करताना दिसून येईल. त्यासाठी तो सज्जही झाला आहे आणि त्यावर त्याने सराव करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरही पोस्ट केला असून त्यामध्ये तो जोरदार सराव करताना दिसत आहे.लोकेश राहुलच्या या व्हिडिओवरून आपल्याला अंदाज अंदाज येऊ शकतो की त्याने आयपीएलची तयारी सुरू केली आहे.

- Advertisement -

यंदाची आयपीएल 19 सप्टेंबरपासून युएईमध्ये सुरू होणार आहे.आयपीएलच्या 13 व्या सत्रात लोकेश राहुल किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार असेल. व्हिडिओमध्ये राहुलने किंग्ज इलेव्हन पंजाब संघालाही टॅग केले आहे.

आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार असणारा के एल राहुल हा भारताचा पाचवा आणि जगातील 12 वा खेळाडू आहे. आत्तापर्यंत एकही आयपीएल चषक न जिंकलेला किंग्ज इलेव्हनचा संघ यावेळी तरी जिंकतो का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.