‘कोमो स्टाॅक’ कंपनीत उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे पार्टनर ; किरीट यांचा मोठा आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गेल्या अनेक दिवसापासून भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या याच्यांकडून शिवसेना व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याच्या कुटुंबियांच्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. दरम्यान आज सोमय्या यांनी पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे व तेजस ठाकरे यांच्यावर मोठा आरोप केला. “कोमो स्टाॅक प्राॅपर्टीज नावाने कंपनी आहे, यात ऊद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे पार्टनर आहेत. या विरोधात मी टकराड येत सर्व पुरावे दिले आहेत. मी दिल्लीत गेल्यानंतर इथले घोटाळेबाज सक्रीय होतात. मी तर फकिर आहे, जनतेनं मला मोठं केलं आहे, असे सोमय्या यांनी म्हंटले.

किरीट सोमय्या यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, “संपूर्ण ठाकरे कुटूंबच सध्याभ्रष्टाचारी आहे. या कुटुंबातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे यांच्यासह रश्मी ठाकरे हे एका कंपनीचे पार्टनर आहेत. अशा परिस्थितीत ते म्हणतात दापोली रिसाॅर्ट पडणार नाही. मात्र, आम्ही म्हणतो आम्हीही ते पाडल्याशिवाय राहणार नाही.

२३ तारखेला सुनावणी आहे, त्यापुर्वी मी आत्ता दापोलीला जाणार असून हिंमत असेल तर मला अडवून दाखवावे. या ठाकरे कुटूंबाबद्दल सांगायचे झाले सर्व कोमो स्टाॅक प्राॅपर्टीज नावाने कंपनी आहे, यात ऊद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे पार्टनर आहेत. त्यांनी २३ मार्च २०१४ ला कंपनी फाॅर्म २०१९ ला नंदकिशोर चतुर्वेदीला विकली. यात पार्टनर नंदकिशोर चतुर्वेदी ५६ टक्के, ल्युक बेनेडिक्ट आॅस्ट्रोलियन ३४ टक्के, इतर १० टक्के अशी भागीदारी घेतली. ७ कोटींचं मनी लाॅंड्रींग झाल. या मनी लाॅंड्रींगमध्ये विदेशी व्यक्तीचा समावेश आहे, असेही सोमय्या यांनी म्हंटले.

Leave a Comment