अनिल परबांच्या घरावर ED ची धाड, किरीट सोमय्यांनी दिली ‘ही’ पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते अनिल परब यांच्या वांद्रेतील घरावर सक्तवसुली संचलनालयाने (ईडी)आज सकाळी धाड टाकली आहे. मनी लॉडिंग प्रकरणी ईडीने गुन्हा दाखल करत ही कारवाई केली असून याबाबत भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी ट्विट करत आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “ईडीची कारवाई सुरु, अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यानंतर आता अनिल परब आता कपड्यांची बॅग तयार ठेवावी,” असे सोमय्या यांनी म्हंटले आहे.

अनिल परब यांच्यावर ईडीने कारवाई केल्याची माहिती मिळताच किरीट सोमय्या यांनी ट्विटरद्वारे पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हंटले हे की, अनिल परब यांनी २०-२१ मध्ये दापोलीत अनधिकृत रिसॉर्ट बांधले. त्यानंतर रिसॉर्टच्या चौकशीनंतर केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने दापोली कोर्टात फौजदारी खटला दाखल केला. अनिल परब यांनी शेकडो कोटींचे गैरव्यवहार केला आहे. आयकर विभागाचे छापे पडले तेव्हा अनिल परब यांचे पार्टनर संजय कदम यांच्या घरात साडेतीन कोटी रुपये रोख सापडले.

अनिल परब यांच्यावर अनधिकृत रिसॉर्ट प्रकरणी जो फौजदारी खटला दाखल करण्यात आलेला आहे तो भारत सरकारने दाखल केला आहे. फसवणुकीची कारवाई ठाकरे सरकारने केली. उद्धव ठाकरेंनी अशा पद्धतीने अनिल परब यांचा काटा काढला. फसवणुकीच्या ऑर्डरवर आदित्य ठाकरे यांनी स्वाक्षरी केली आहे. म्हणून मी आताचे ठाकरे कुटुंब माफिया आहे, असे मी म्हणतो.

दरम्यान, ईडीचे अधिकारी सकाळी अनिल परब यांच्या वांद्रे येथील घरी आणि मरिन ड्राईव्हमधील सरकारी निवासस्थानी दाखल झाले. यासोबत पुणे आणि रत्नागिरीमधील अनिल परब यांच्या मालकीच्या जागांचीही पाहणी केली आहे. मंत्री अनिल परब यांच्या घरावर ईडीने छापा टाकल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं प्रकरण काय?

शिवसेना नेते अनिल परब यांच्या ठिकठिकाणी असलेल्या निवासस्थानी आज सकाळी ईडीने धाड टाकत कारवाई केली. नेमके हे प्रकरण काय? असा अनेक जणांच्या मनात प्रश्न पडला असेल. तर हे प्रकरण आहे पर्यावरण मंत्रालय भारत सरकार यांनी 31 जानेवारी 2022 रोजी दापोली रत्नागिरी येथील साई रिसॉर्ट एन एक्स व सी कोच हे अनधिकृत असून तोडण्याचे आदेश दिले होते. 90 दिवसांमध्ये रिसॉर्ट मालक किंवा प्रशासनाने हे दोन्ही रिसॉर्ट तोडायचे होते. मात्र, 90 दिवस पूर्ण झाले असून अजूनही रिसॉर्ट पाडण्यात आले नाही. त्यामुळे या प्रकरणी हि आजची कारवाई करण्यात आलेली आहे.

Leave a Comment