“आता हसन मुश्रीफ आणि अनिल परब या दोघांचा नंबर लागणार”; किरीट सोमय्यांचे महत्वाचे ट्विट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेते जेलमध्ये जाणार असे म्हण्टल्यानंतर ईडीच्यावतीने त्या त्या नेत्यांवर कारवाई देखील करण्यात अली आहे. दरम्यान आता सोमय्या यांनी आघाडीतील दोन मोठ्या नेत्यांबाबत ट्विट करीत दावा केला आहे. आघाडीतील अजून दोन नेते जेलमध्ये जाणार असून त्यामध्ये मंत्री हसन मुश्रीफ आणि अनिल परब यांचा आता नंबर लागणार आहे, असे सोमय्या यांनी म्हंटले आहे.

किरीट सोमय्या यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. तसेच ट्विट करीत महाविकास आघाडी सरकार यांच्यावर निशाणाही साधला. यावेळी सोमय्या म्हणाले की, “शिवसेना नेते तथा परिवहन मंत्री अनिल परब हे माझा रिसॉर्टशी काहीच संबंध नाही असे गेल्या सहा महिन्यांपासून रोज सांगत आहेत. मात्र, परबांनो एक गोष्ट लक्षात घ्या की, मोदी सरकारने याचिका दाखल केली आहे. तुम्ही या याचिकेत गुन्हेगार आहात. ही केंद्र सरकारची याचिका आहे. कोर्टाने त्याची दखल घेतली आहे. येत्या 16 एप्रिल रोजी त्यावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे परबांनो, बॅग भरा. तयारी करा.

हसन मुश्रीफ यांनी ज्या शेल कंपन्यांमध्ये पैसा गुंतवला आहे. घोटाळा केला आहे. त्याचा तपास करण्याचे आदेश कोर्टाकडून दिले जाणार आहेत. त्यांच्या कारनाम्यांवरील कारवाईला आजपासून सुरुवात होणार आहे. त्यांनी घोटाळे केले, आम्ही त्याची तक्रार केंद्र सरकारकडे केली. केंद्राने तक्रारीची दखल घेतली आहे. त्यावर आज सुनावणी होणार आहे. एकूण 158 कोटींचा घोटाळा आहे. आता ईडी, कंपनी मंत्रालय आणि आयटी विभाग कारवाई करू शकतात, असे सोमय्या यांनी म्हंटले.

Leave a Comment