किरीट सोमय्या दापोलीला रवाना : रिसाॅर्ट तोडण्यासाठी भलामोठा हातोडाही सोबत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचा दापोलीतील मुरुडमध्ये असणाऱ्या रिसॉर्टचा विषय पुन्हा चर्चेत आलं. आज सोमय्या सव्वा सात वाजेच्या सुमारास मुंबईतील आपल्या घरापासून दापोलीला निघाले आहेत. यावेळी त्यांच्या सोबत कार्यकर्त्यांची गर्दी होती. सोमय्या यांच्या दापोली दौऱ्यात अनेक ठिकाणी भाजप कार्यकर्ते त्यांचं स्वागत करत त्यांच्या या दौऱ्यात सामील होणार असल्याची माहिती भाजप कार्यकर्त्यांनी दिली आहे. त्यामुळे आज राजकीय राडा पहायला मिळणार असून या विषयाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे.

यावेळी त्यांनी चलो दापोली, तोडो रिसॉर्टचा नारा दिला. घरातून निघण्यापूर्वी सोमय्या यांनी एक प्रतिकात्मक भला मोठा हातोडाही मीडियाला दाखवला. हा हातोडा जनतेच्या भावनेचं प्रतिक आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अनधिकृत बांधकाम असणाऱ्या मंत्र्यांचं हॉटेल तात्काळ पाडावं. आज जर हे रिसॉर्ट पाडलं नाही तर आज ना उद्या अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना तुरुंगात जावं लागेल, असा इशारा सोमय्या यांनी दिला. तसेच मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबाच्या भ्रष्टाचारावरूनही त्यांनी जोरदार हल्ला केला.

शिवसेना राष्ट्रवादी विरोध करणार तर निलेश राणे बुलडोझर आणणार

किरीट सोमय्यांच्या या दौऱ्याचा विरोध करण्यासाठी सेना-राष्ट्रवादीकडून तयारी करण्यात आली असल्याचं समजतंय. त्यामुळे आता दापोली किंवा रस्त्यात अनेक ठिकाणी संघर्ष निर्माण होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. तर किरीट सोमय्या यांना कोणी विरोध केल्यास आपण बुलडोझर आणू असे माजी खासदार निलेश राणे यांनी सांगितले आहे.

तब्बल 50 गाड्यांचा ताफा घेऊन दापोलीमध्ये जाणार सोमय्या

तब्बल 50 गाड्यांचा ताफा घेऊन सोमय्या दापोलीमध्ये जाणार असल्याची माहिती भाजप कार्यकर्त्यांकडून मिळतेय. त्यामुळे आता शिवसैनिकांकडून देखील या दौऱ्याला रोखण्याचा प्रयत्न होईल अशी शक्यता आहे.

Leave a Comment