“19 बंगले नावावर करण्यासाठी रश्मी ठाकरेंनीच ग्रामपंचायतीला लिहिले पत्र”; किरीट सोमय्यांचे ट्विट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरील आरोप सिद्ध करण्याचे आव्हान दिले. त्यानंतर आता भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी आता रश्मी ठाकरेंचेच पत्र त्याच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केले आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी हे 19 बंगले नावावर करण्यासाठी कोर्लई ग्रामपंचायतीला लिहिले होते,” असे सोमय्या यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

किरीट सोमय्या यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हंटले आहार की, जानेवारी (आणि मे) 2019 मध्ये श्रीमती रश्मी उद्धव ठाकरे यांनी कोर्लई ग्रामपंचायत अलिबागला त्यांच्या नावावर 19 बंगले ट्रान्स्फर करण्यासाठी पत्र लिहिले आहे. या संदर्भात सोमय्या यांनी म्हंटले की, “ग्रामपंचायतीचा रेकॉर्ड गेल्या वर्षी मी मिळवला आहे. त्यात ग्रामपंचायतीने रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांच्यातर्फे 30 जानेवारी 2019 रोजी घरपट्टी नावे करण्याचा अर्ज आला असून मान्य करण्यात आल्याचं नमूद आहे.

रश्मी ठाकरेंच्या नावाने घरं दाखवत आहेत. इतकंच नाही तर रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांनी एप्रिल 2014 मध्ये करार केला. त्यात घरं असल्याचे पुरावे त्यांनी जोडले असून किरीट सोमय्या, नील सोमय्या यांनी जोडलेले नाहीत. महत्वाचं म्हणजे हे घर वनविभागाच्या जमिनीवर बांधण्यात आलं आहे,” अशी माहिती किरीट सोमय्या यांनी दिली.

Leave a Comment