Wednesday, October 5, 2022

Buy now

अब अनिल परब का नंबर भी आयेगा; सोमय्यांचं ट्वीट चर्चेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते किरीट सोमय्या हे गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील नेत्यांवर भ्रष्ट्राचाराचे आरोप करत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भ्रष्ट्राचाराचे आरोप केल्यांनतर आता त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे. अब अनील परब का भी नंबर आयेगा असे ट्विट करत त्यांनी सूचक इशारा दिला आहे.

किरीट सोमय्या म्हणाले की, “आत्ता अनिल परबचाही नंबर लागणार. अनधिकृत, बेनामी रिसॉर्ट आणि रिसॉर्ट बांधकामासाठी आलेला पैसा… चौकशी होणार. भारत सरकारनं दापोली कोर्टात तक्रार दाखल केली आहे. 30 मार्च रोजी सुनावणी होणार” असे म्हणत सोमय्यांनी रिसॉर्टचे दोन फोटोही शेअर केले आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांनी १२ जणांची यादी जाहीर केली होती. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसमवेत अनिल परब, संजय राऊत यांच्या सारख्या दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. मुरुड गावात अनिल परब यांनी बेकायदेशीररित्या रिसॉर्ट आणि बंगला बांधला आहे. ज्याची चौकशी सुरु आहे. त्याचा जवळील भव्य बंगल्यावर कारवाई येत्या काही दिवसांत होणार आहे. असे सोमय्या म्हणाले होते