“सरकार पन्नास वर्ष चालू दे, पण पन्नास दिवसांत डर्टी डजन हे जेलमध्ये जाणार”; किरीट सोमय्यांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याकडून ठाकरे कुटूंबियांवर अनेक आरोप केले जात आहेत. दरम्यान त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरही आरोप केला आहे. आता त्यांनी पुन्हा इशारा दिला आहे. “नवाब मलिक काही वर्ष बाहेर येणार नाहीत. दहशतवाद्यांना माफी नाही. आणि सरकार पन्नास वर्ष चालू दे, आम्हाला जनतेची सेवा करायची आहे. 50 दिवसांत डर्टी डजन हे जेलमध्ये धक्के खात असणार, असा इशारा सोमय्या यांनी दिला आहे.

किरीट सोमय्या यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी यशवंत जाधव यांच्या प्रकरणावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. यावेळी सोमय्या म्हणाले की, मुख्यमंत्री ठाकरे मातोश्रीहून गंमत जंमत करत आहे. स्वतःला वाचवण्यासाठी आईला साधन बनवता. दोन कोटी रोख आईला दिले मग जीएसटी कुठे आहे. पैसे कसे दिले? यशवंत जाधव म्हणतील की 10 टक्के माझ्याकडे 90 टक्के वर जातात.

वास्तविक पाहता हा पैसा नालेसफाईतून आलेला आहे. सगळे घोटाळेबाज आहेत. सगळ्यांवर कारवाई होणार. 37 बिल्डींग घेतली त्याचीही चौकशी होणार. कुणाला किती टक्के दिले त्याचीही चौकशी होणार आणि ती चौकशी जीएसटीवाले करणार, असा इशारा सोमय्या यांनी दिला.