किरीट सोमय्यांचा कोल्हापूर दाैरा मंगळवारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | मुलुंड, सीसीएसटी पोलिसांनी गैरमार्गाने मला रोखले. येत्या 24 तासांत मुंबई व मुलुंड पोलिसांनी कारवाई मागावी. तसेच पुन्हा कोल्हापूर येत्या मंगळवारी दि. 28 रोजी अंबाबाईच्या दर्शनाला जाणार असल्याचे भाजपचे नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सांगितले. त्यामुळे पुन्हा एकदा कोल्हापूर दाैरा कसा होणार याकडे लक्ष लागून राहणार आहे.

आज बुधवारी दि. 22 रोजी किरीट सोमय्या यांनी मुंबई पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर ते पत्रकारांशी संवाद साधत होते. राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर किरीट सोमय्या कोल्हापूरला महालक्ष्मी एक्सप्रेसमधून रवाना झाले होते. मात्र त्यांना कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी जिल्हाबंदी असल्याचा आदेश दिला होता. अशावेळी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास कराड येथील रेल्वे स्टेशनवरती कराड पोलिसांनी किरीट सोमय्या यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर कराडमधून त्यांना मुंबईला परतावे लागले होते.

किरीट सोमय्या म्हणाले, कोल्हापूरला मी मंगळवारी जाणार आहे. अंबाबाई मातेचे दर्शन घेणार आहे. त्या संदर्भात कोल्हापूरचे जिल्हाधिकारी व पोलिस प्रमुख यांना कल्पना दिलेली आहे. त्यामुळे मी कोल्हापूरला जाणारच आहे.

Leave a Comment