… तर विभास साठेंचाही मनसुख हिरेन होईल; परबांवरील कारवाईनंतर किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित सात ठिकाणांवर ईडीच्यावतीने छापेमारी करण्यात आली. यामध्ये अनिल परब यांना दापोलीतील रिसॉर्टची कथित विक्री करणारे विभास साठे यांच्या निवासस्थान, कार्यालयाचाही समावेश आहे. या रिसॉर्टप्रकरणी कारवाईनंतर किरीट सोमय्या आक्रमक झाले असून त्यांनी ट्विट करत थेट महाराष्ट्र पोलीस महासंचालकांनाच पत्र लिहले आहे. या प्रकरणातील व्यावसायिक विभास साठे यांच्या जीवाला धोका आहे. त्यांना सुरक्षा जर दिली नाही तर साठेंचा मनसुख होईल, असे सोमय्या यांनी म्हंटले आहे.

किरीट सोमय्या यांनीलिहलेले पत्रच ट्विट केले असून त्यात म्हंटले आहे की, “मंत्री अनिल परब रिसॉर्ट घोटाळ्याची चौकशी आणि कारवाई सुरू आहे. परब यांनी विभास साठे कडून जमीन घेतली होती. “विभास साठे यांचे “मनसुख हिरण” होऊ नये.” विभास साठे यांच्या जिवाला धोका लक्षात ठेऊन त्यांचा सुरक्षेची व्यवस्था महाराष्ट्र पोलिसांनी करावी अशी विनंती मी महासंचालक यांना केली आहे.

काय म्हंटले आहे पत्रात?

सोमय्यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले की, “अनिल परब यांच्या दापोली रिसॉर्ट घोटाळ्याची चौकशी सुरु आहे. या घोटाळ्यासंबंधी अनेक तपास यंत्रणा, संस्थांनी तसंच पर्यावरण मंत्रालय महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार यांनी अनिल परब आणि त्यांच्या साई रिसॉर्ट एनएक्सवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. अनिल परब यांनी 2017 मध्ये विभास साठे यांच्याकडून दापोली येथील मुरुड समुद्र किनाऱ्यावरील जमीन घेतली व फसवणूक करत रिसॉर्ट बांधला. अनिल परब या घोटाळ्यामुळे अडचणीत आले असून आम्हाला भीती वाटते की, अनिल परब हे विभास साठेंवर दडपण आणणार. विभास साठे यांचे मनसुख हिरेन होऊ नये हे पाहणे महाराष्ट्र पोलिसांची जबाबदारी आहे.

Leave a Comment