शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी भुजबळांच्या संपत्तीची माहिती द्यावी; किरीट सोमय्यांचं खुलं आव्हान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मंत्री छगन भुजबळांच्या संपत्तीची माहिती द्यावी अस खुल आव्हान भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिले आहे. तसेच भुजबळ ज्या नऊ मजली इमारतीत राहतात, त्या इमारतीशी तुमचा संबंध काय हे भुजबळांनी स्पष्ट करावं, अशी मागणीही त्यांनी केली. ते नाशिक येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

किरीट सोमय्या यांनी भुजबळांवर भ्रष्टाचाराचे थेट आरोप केले. आर्मस्ट्राँगच्या नावाने भुजबळांनी काळा पैसा व्हाईट केला आहे. मुळात ज्यांच्याकडून ही कंपनी खरेदी केली ती कंपनीच बनावट आहे. तसेच मुंबईत दहा वर्षांपासून राहत असलेल्या 9 मजली इमारतीचे मालक परवेज कन्स्ट्रक्शन प्रा. ली. हे दाखवले आहेत. त्यांच्या तुमच्याशी काय संबंध हे देखील स्पष्ट करावे असे सोमय्यांनी म्हंटल.

ते पुढे म्हणाले, आर्मस्ट्राँग असेल किंवा मुंबईतील इमारत या सर्व बनावट कंपनांच्या नावाने खरेदी करुन भुजबळांनी तब्बल 120 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला. त्यामुळे त्यांच्यावर मनी लाँण्ड्रींग अंतर्गत ‘ईडी’ने कारवाई केली आहे. तसेच माझे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना खुले आव्हान आहे की, त्यांनी या सर्व प्रकरणांचा खूलासा करावा असेही सोमय्या यांनी म्हंटल.

Leave a Comment