प्रसिद्ध महाराजांचे कीर्तनकार महिलेसोबत नको त्या अवस्थेत चाळे; Video होतोय व्हायरल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – अनेक वर्षे औरंगाबाद आणि जिल्ह्याबाहेर एक प्रतिष्ठीत किर्तनकार म्हणून ओळख असलेल्या एका महाराजांचा ‘पोर्न व्हिडीओ’ व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडिओने त्यांना मानणाऱ्या भक्तांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, हे महाराज आणि व्हिडिओमध्ये दिसणारी महिला गेल्या अनेक दिवसांपासून कीर्तन सादर करतात. या व्हिडिओनंतर इतर वारकरी संघटनेकडून या किर्तनकार महाराजावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

एका महिलेसोबत हे किर्तनकार नको त्या अवस्थेत दिसत असून याच्या दोन व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. व्हिडिओतील किर्तनकार महाराज हे जिल्ह्यातील नामवंत किर्तनकार आहेत. त्यांचा मोठा भक्त परिवार आहे. दोघांचे युट्यूबवर मोठे फॉलोअर्सवर सुद्धा आहेत. मात्र, त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने त्यांचा भक्तांना मोठा धक्का बसला आहे, असे स्थानिकांनी म्हटले आहे

काय आहे तक्रार ?

किर्तनकार महाराजांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज सेनेचे ह.भ. प. ज्ञानेश्वर महाराज डोणगावकर यांनी व्हिडिओमध्ये असलेल्या किर्तनकार महाराज आणि महिलेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याबाबत शिल्लेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. आपल्या किर्तनातून भक्ती व समाजप्रबोधन करत असल्यामुळे लाखो लोक त्यांना धार्मिक क्षेत्रात आपले आदर्श मानतात.

आनंद संप्रदायिक असूनही बरेच वारकरीही त्यांना आपले आदर्श मानत आणि आपापल्या परिसरात त्यांचे किर्तनाचेही आयोजन करतात. मात्र या दोघांनीही त्या लाखो श्रध्दाळू लोकांच्या धार्मिक भावनांवर खूप मोठा आघात केला. महाराष्ट्रातील लोकांची आस्था आपल्या असभ्य वर्तनुकीचे अश्लील प्रदर्शन करून त्यांनी ती आस्था पायदळी तुडविली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी तक्रारीतून करण्यात आली आहे.

Leave a Comment