किसान क्रेडिट कार्डचे फायदे काय आहेत? जाणून घ्या कार्ड कसे मिळवायचे ते

नवी दिल्ली | पंतप्रधान शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या अडीच कोटी शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या किसान क्रेडिट कार्डमार्फत शेतकरी बी- बियाणे, खाते इत्यादी गोष्टी कमी व्याजदरात खरेदी करू शकतो. 1.6 लाखापर्यंतचे कर्ज विना गॅरंटीने किसान क्रेडिट कार्डमार्फत मिळू शकेल. यासोबतच अनेक फायदे शेतकऱ्यांना या क्रेडिट कार्डमधून मिळू शकतात. जाणून घेऊ हे कार्ड कसे बनवायचे याबाबत. Kisan Credit Card Benefits

आता किसान क्रेडिट कार्ड बनवण्याची प्रक्रिया केंद्र शासनाने अतिशय सोपी केली आहे. यावरील प्रक्रिया शुल्क रद्द करून, बँकांना गावोगावी स्टॉल लावण्याचे आदेश दिले गेले आहेत. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना आणि केसिसी स्किमला लिंक केल्यानंतर देशातील दीड लाख शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्यात आले आहे. या निर्णयामुळे कोणतीही बँक किसान क्रेडिट कार्ड देण्यास मनाई करू शकत नाही. Kisan Credit Card Benefits

बँकेत जाऊन विहित नमुन्यात अर्ज करावा. ओळखपत्र म्हणून मतदार कार्ड, पासपोर्ट, आधारकार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स देऊ शकता. शेतकरी असल्याचा दाखला. खंडाने जामीन करणारे शेतकरी गट यांनाही अर्ज करता येऊ शकणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा मिळू शकणार आहे.

You might also like