हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शेतकरी बांधवांनांसाठी सरकारने सुरु केलेली किसान क्रेडिट कार्डची सुविधा ही खूप लाभकारक आहे. शेतकऱ्यांना वेळेवरती पैसाची मदत व्हावी, शेती साहित्य घेण्यासाठी किसान क्रेडिट कार्डचा उपयोग होत असतो. यासह किसान क्रेडिट कार्डवरुन कर्ज घेतल्यास बँक त्याला कमी व्याजदर आकारत असते. बँक साधरण ९ टक्के व्याज आकरत असते. परंतु सरकार यात २ टक्क्यांची सुट देत असते. त्यात एखादा शेतकरी वेळेवर कर्जाची परतफेड करत असेल तर त्याला अतिरिक्त ३ टक्के सुट मिळत असते. अशात शेतकऱ्यांना फक्त ४ टक्के व्याज दरावर कर्ज मिळत असते.
केसीसीसाठी अर्ज करताना ओळख पत्र , आधार कार्ड, पॅनकार्ड, वाहनचालक परवाना, इत्यादी कागदपत्राची फोटोकॉफी देणे आवश्यक असते. यासह आपले बँकेचे पासबुकचा फोटो, पासपोर्ट साईज फोटो आणि केसीसी योजनेचा अर्ज भरुन द्यावा लागतो. किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज थेट बँकेतही करू शकतो. यासाठी बँकेच्या वेबसाईटवर जाऊन तेथे अर्ज करु शकतो. येथे आपल्याला क्रेडिट कार्ड लिस्ट मध्ये किसान क्रेडिट कार्डचा पर्याय दिसेल तो निवडा. तेथे अप्लाय या बटणावर क्लिक करावे. त्यानंतर ऑनलाईन ऑप्लिकेशन पेज ओपन होईल. येथे मागण्यात आलेली सर्व माहिती भरुन या अर्जाला सबमिट करावे. यादरम्यान ऑप्लिकेशन रेफेरन्स नंबर नोट करावे. बँकेच्या नियामात आपण बसलो तर बँक आपल्याला संपर्क करेल. त्यानंतर आपण आपले कागदपत्र बँकेला द्यावे.
कागदपत्रांची कामे पुर्ण झाल्यानंतर किसान क्रेडिट कार्ड आपल्या घरी काही दिवसात पाठविले जाईल. दरम्यान किसान क्रेडिट कार्ड हे कोणत्याही को-ऑपरेटिव्ह बँक, क्षेत्रिय ग्रामीण, बँकेतून मिळू शकते. यासह काही खासगी बँकांही किसान क्रेडिट कार्डची सुविधा पुरवत आहेत. दरम्यान जर आपण पंतप्रधान किसान शेतकरी सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्ही पीएम किसानच्या संकेतस्थळावरुनही किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज करु शकतात.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’