किसान सभेचे राज्यभरात जेल भरो आंदोलन!

Thumbnail
Thumbnail
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पालघर | ठाणे जिल्ह्यात दिनांक ८ आणि ऑगस्ट रोजी अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली आणि सीटू, जनवादी महिला संघटना, डीवायएफआय व एसएफआय यांच्या सहभागाने २१,००० हून अधिक लोकांनी रस्ता रोको व जेल भरो आंदोलन केले. यावेळी तलासरीत मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग अर्धा तास अडवून धरण्यात आला. दरम्यान पोलिसांनी आंदोलन करत्यांना अटक केली. इतक्या लोकांना जेलमध्ये ठेवण्याची सोय नसल्याने पोलिसांची तारांबळ उडाली. आंदोलकांची नावे नोंदवून सायंकाळी सोडून देण्यात आले.

सर्व ठिकाणी जेल भरो आंदोलनात नेत्यांनी भाजपच्या मोदी आणि फडणवीस सरकारांवर तोफ डागली आणि या सरकारांना ‘भारत छोडो’ दिनी ‘चले जाव’चा बुलंद इशारा दिला. जेल भरो आंदोलनातील तालुकानिहाय संख्या पुढीलप्रमाणे होती: विक्रमगड – ५५००, डहाणू – ३५००, शहापूर – ३०००, वाडा – ३०००, तलासरी – २५००, जव्हार-मोखाडा – २५००, पालघर – १०००, एकूण – २१,०००. ऐन पावसाचा जोर आणि भातशेतीची कामे अपुरी राहिली असतानाही इतकी संख्या होती हे विशेष.

या आंदोलनाचे नेतृत्व ठिकठिकाणी पुढील कॉम्रेडसनी केले. डहाणू – डॉ. अशोक ढवळे, एल.बी.धनगर, एडवर्ड वरठा, विनोद निकोले, लहानी दौडा, चंद्रकांत घोरखाना, चंद्रकांत वरठा, रामदास सुतार, मेरी रावते; तलासरी – किसन गुजर, बारक्या मांगात, लक्ष्मण डोंबरे, वनशा दुमाडा, सविता डावरे, सुनीता शिंगडा, रामू पागी, नंदू हाडळ; विक्रमगड – मरियम ढवळे, किरण गहला, राजा गहला, अमृत भावर, ताई बेंदर, चिंतू कानल; शहापूर – भरत वळंबा, सुनील करबट, नितीन काकरा, कृष्णा भावर, सुनीता ओझरे, विजय पाटील, प्राची हातिवलेकर, नितीन धुळे; वाडा – किसन गुजर, सुनील धानवा, विनोद निकोले, चंदू धांगडा, लक्ष्मण काकड, रमा तारवी, प्रकाश चौधरी; जव्हार – रतन बुधर, यशवंत घाटाळ, शिवराम बुधर; पालघर – सुदाम धिंडा, सुनील सुर्वे, हीना वनगा, बबलू त्रिवेदी.