Kitchen Hacks | आजकाल प्रत्येकाच्या घरीच गॅस सिलेंडर असतो. परंतु या गॅसमधून नेहमीच एक प्रॉब्लेम येत असतो. तो म्हणजे गॅसच्या एका बर्नरमधून कमी जाळ येत असतो. तर दुसऱ्या बर्नर मधून जास्त जाळ येत असतो. परंतु कमी जाळ येतो त्या बर्नरकडे आपण नेहमीच दुर्लक्ष करतो. आणि ज्या बर्नरमधून चांगला जाळ येतोय. त्यावर आपण अन्न शिजवतो.
परंतु तुम्ही या समस्येकडे अजिबात दुर्लक्ष करता कामा नये. अन्यथा पुढे जाऊन तुम्हाला खूप मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल . तर आज आपण तुमच्या गॅसमधून जाळ जर कमी येत असेल तर त्यासाठी काय टिप्स कराव्या जेणेकरून तुमच्या दोन्ही बर्नर मधून चांगला जाईल हे पाहूया.
स्वच्छता ठेवा
तुम्हाला तुमच्या बर्नरची धमनी नेहमी स्वच्छ ठेवावी लागेल. जर तुमच्या बर्नरच्या धमनीमध्ये जास्त घाण अडकली तर त्या घाणीमुळे जास्त प्रकाश बर्नर मधून बाहेर येणार नाही.
अंडी शिजवल्यानंतर बर्नर साफ करणे
तुम्ही जरा बर्नर वर अंड शिजवले आणि त्याची इकडे तिकडे सर्वत्र घाण पसरली. तर त्या जास्त घाणीमुळे तुमच्या बर्नरमधील छिद्रे गच्च होतात आणि बर्नरमधून जाळ बाहेर येत नाही.
गॅस वॉल्व तपासा | Kitchen Hacks
तुमच्या गॅसचे वॉल्व चांगले नसेल तरी देखील कमी आग येण्याची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे तो नियमितपणे तपासा आणि तो खराब झाला असल्यास दुरुस्त करून घ्या.
गॅसचे रेग्युलेटर वेळेवर तपासणे
जर गॅसच्या रेग्युलेटरमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर ही देखील तुमच्या बर्नरमधून कमी जाळ येतो. त्यामुळे ते वेळेवर दुरुस्त करणे गरजेचे आहे
तुमच्या गॅसचे कनेक्शन तपासा
कधी कधी जर तुमच्या गॅसची कनेक्शन देखील नीट नसेल तरी देखील त्यातून खूप कमी जाळ येतो. आणि तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.