Kitchen Tips : गॅसची फ्लेम मंद होते का ? घराच्या घरी करा सोपे उपाय

Kitchen Tips Gas
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Kitchen Tips : सख्यंनो किचन हे घरातल्या प्रत्येक गृहिणीचं हक्काचं ठिकाण असतं. किचनमधल्या गोष्टी टापटीप आणि नीटनेटक्या ठेवायला गृहिणींना आवडतात. बऱ्याचदा आपण पाहतो की किचनचा ओटा गॅस शेगडी सर्व काही दरोरोज साफ केली जाते. मात्र गॅसचा (Kitchen Tips) बर्नर ही बाबा हमखास विसरली जाते. त्यामुळे कालांतराने गॅसचे बर्नर कमी पेटायला लागतात. म्हणजेच त्यामधून येणारी फ्लेम कमी होत जाते. मग स्वयंपाकाला साहजिकच वेळ लागतो आणि तुम्हाला पुढचं काम वेळेत करता येत नाही.

असे झाल्यास आपण लगेचच गॅस दुरूस्त (Kitchen Tips) करणाऱ्याला घरी बोलावतो. मात्र तसे न करता गॅस बर्नरची कमी झालेली फ्लेम मोठी कशी करता येईल हे आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत. बऱ्याच वेळा कामाच्या व्यापामुळे आपण फक्त गॅस शेगडी साफ करतो मात्र बर्नर साफ करण्याचे राहून जाते. त्यामुळे बर्नरच्या छिद्रांमध्ये घाण अडकते. त्यामुळे बर्नरची फ्लेम कमी होते त्यामुळे काही घरगुती साहित्यांचा वापर करून बर्नर स्वच्छ कसा करायचा हे जाणून घेऊया

  • आपण गॅस बर्नर मीठ आणि लिंबाच्या वापराने स्वच्छ करू शकता. यासाठी लिंबू कापून त्याला मीठ लावून बर्नर वर घासा आणि नंतर बर्नर स्वच्छ धुऊन घ्या बर्नर व्यवस्थित स्वच्छ (Kitchen Tips) होईल.
  • गॅस व्हॉल्वच्या बिघाडामुळे गॅस फ्लेमची (Kitchen Tips) समस्या निर्माण होते. जर गॅस फ्लेम कमी किंवा व्यवस्थित पेटत नसेल तर एकदा गॅस वॉल्व सुद्धा तपासून घ्या
  • जर आपल्या सिलेंडरचा गॅस रेग्युलेटर खराब झाला असेल तर तो तपासून घ्या (Kitchen Tips) त्यामुळे गॅसची फ्लेम कमी होऊ शकते.
  • बऱ्याचदा गॅस आणि सिलेंडर मध्ये झालेल्या मिस कनेक्शन मुळे ही गॅसची फ्लेम बंद होऊ शकते. त्यामुळे दिवसातून एकदा गॅस कनेक्शन तपासा.
  • गॅस सिलेंडरचा पाईप तपासून घ्या (Kitchen Tips) गॅस सिलेंडरचा पाईप दीर्घकाळ वापरताना तो जुना होतो त्यामुळे स्फोट होण्याचा धोका नाकारता येत नाही पाईप दीर्घकाळ न बदलल्याने फ्लेम बंद होते बरीच वर्ष झाली असतील तर पाईप बदलून घ्या.