Kitchen Tips : घरचं साजूक तूप म्हणजे आहाहा …! त्याला काही तोडच नाही. जवळपास प्रत्येक गृहिणी दुधावरची साय साठवून साठवून घरी साजूक तूप बनवत असते. मात्र कधीकधी कितीतरी वेळा ताक ढवळले तरी लोणी येत नाही. विशेषतः उन्हाळ्यामध्ये ही समस्या हमखास उदभवते. त्यामुळे आजच्या लेखात आम्ही तुम्हाला अशी एक ट्रिक सांगणार आहोत ज्यामुळे लगेचच लोणी निघेल शिवाय तुमचा वेळ आणि मेहनतही वाचणार आहे. ही ट्रिक (Kitchen Tips) इंस्टाग्रामवर एका गृहिणीने शेअर केली आहे.
अशा पद्धतीने काढा लोणी (Kitchen Tips)
- सर्वात आधी तुम्हाला घट्ट दुधाची साय साठवायची आहे. ही साय फ्रिजमध्ये साठवली तरी हरकत नाही.
- या सोयीला लोणी काढण्याच्या आदल्या दिवशी दही लावा.
- साठवलेल्या सायीचे लोणी काढत असताना यामध्ये (Kitchen Tips) बर्फाचे खडे घाला. किंवा थंड पाणी घाला यामुळे उन्हाळ्यात लोणी पटकन निघते.
- शिवाय लोणी धुताना देखील थंड पाणी किंवा बर्फाचे खडे घातलेले पाणी वापरा.
- ही ट्रेक वापरल्यामुळे लोणी आणि ताक चांगल्या पद्धतीने वेगळे देखील होते.
- अशापद्धतीने भरपूर लोणी आणि रवाळ साजूक (Kitchen Tips) तूप निघेल.
(टीप -मिक्सर किंवा रवी दोन्ही पद्धतीने लोणी काढताना ही ट्रिक उपयोगी (Kitchen Tips) पडेल )