Kitchen Tips : हात न लावता मळा कणिक ; झटपट तयार होतील मऊ लुसलुशीत पोळ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Kitchen Tips : ताटात गरमागरम मऊ लुसलुशीत पोळी असली की जेवणाची लज्जत किती वाढते हे काही वेगळे सांगायला नको. पण पोळी जेवढी खायला रुचकर असते तेवढीच ती बनवायला कठीण असते. म्हणजे कणिक मळण्यापासून पोळी भाजेपर्यंतचे काम म्हणजे खूप कटकटीचे आणि वेळखाऊ असे अनेकांना वाटते.

शिवाय हल्ली अनेक महिला नोकरी आणि घर अशा दोन्ही जबाबदाऱ्या पार (Kitchen Tips) पाडत असतात. त्यामुळे त्यांच्या कडे वेळ कमी असतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशा एक उपकरणाबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे कणिक मळणे सोपे होणार आहे.

बाजारात एक असे उपकरण उपलब्ध झाले आहे ज्यामुळे तुम्ही पिठाला हात न लावता कणिक मळू शकता. या उपकरणाच्या मदतीने कणिक मळताना कणिक हाताला चिकटत नाही त्यामुळे हात खराब होत नाहीत. किंवा नखांमध्ये कणिक आडकतही (Kitchen Tips) नाही. या उपकरणामुळे कणिक मळणे सोपे होते शिवाय यापासून बनवलेल्या पोळ्या सुद्धा मऊ आणि रुचकर बनतात.

हे उपकरण जागा देखील जास्त घेत नाही. हे उपकरण तुमही ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट (Kitchen Tips) वरून ऑर्डर करू शकता. विशेष म्हणजे या उपकरणाद्वारे कणिक मळण्याशीवाय केक , ढोकळा असे बॅटर सुद्धा तुम्ही आरामात बनवू शकता.