Kitchen Tips : गव्हाच्या पिठात टाका ‘ही’ वस्तू ; सिंक आणि भांडी होतील चकाचक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Kitchen Tips : घरातील प्रत्येक स्त्री आपल्या कुटुंबासाठी रुचकर जेवण बनवत असते. पण अनेकदा स्वयंपाक करून झाल्यावर खरकटी, चिवट, भांडी धुणं म्हणजे डोकेदुखी होऊन बसते. जड पाण्याचे डाग , स्वयंपाकाचे डाग काही केल्या निघत नाहीत. वारंवार वापरून भांड्यांची चकाकी सुद्धा कमी होते. म्हणूनच आज आम्ही अशा काही ट्रिक्स सांगणार आहोत.ज्यामुळे भांडी चांगलीच (Kitchen Tips) चकाकतील. चला तर मग जाणून घेऊया…

आजकाल भांडी घासण्यासाठी बरेच प्रोडक्ट बाजारात मिळतात मात्र अनेकदा काही केल्या भांडी निघत नाहीत म्हणून आज आम्ही एक सोपा उपाय घेऊन आलो आहोत. गव्हाचे पीठ हे प्रत्येक घरात असतेच. मात्र भांडी घासण्यासाठी सुद्धा (Kitchen Tips) चांगला वापर होऊ शकतो. भांडी घासण्यासाठी गव्हाचे पीठ आणि शाम्पू यांचा वापर केल्यास भांडी चकचकीत निघतील. शिवाय सिंक देखील स्वच्छ निघेल.

काय आहे गव्हाच्या पिठाची ट्रिक (Kitchen Tips)

  • भांडी स्वच्छ करण्यासाठी ही ट्रिक तुम्हाला वापरायची असेल तर त्यासाठी तुम्हाला गव्हाचं पीठ शाम्पू आणि स्क्रबर ह्या तीन गोष्टी लागतील.
  • आता सगळ्यात आधी एका प्लेटमध्ये दोन चमचे गव्हाचं पीठ घ्या
  • आता त्यामध्ये एक चमचा शाम्पू घालून चांगले (Kitchen Tips) मिक्स करा
  • आता स्क्रबर मिश्रणात बुडवून भांडे आणि स्वच्छ करा.
  • ॲल्युमिनियमची भांडी किचन सिंक आणि इतर धातूंची भांडी देखील चकाचक होतील.

लिंबू करेल तेलकट भांड्यांची सुट्टी (Kitchen Tips)

भांडी स्वच्छ करण्यासाठी लिंबूचा रस हा अतिशय उपयुक्त ठरू शकतो. त्यामुळे (Kitchen Tips) तेलकट भांडी चांगली निघतील आणि भांड्यांना वासही येणार नाही. ही ट्रिक वापरण्यासाठी एक कप कोमट पाणी घ्या त्यामध्ये दोन चमचे मीठ आणि एक चमचा लिंबाचा रस घालून मिक्स करा या मिश्रणामध्ये स्क्रबर बुडवा आणि भांडी घासा यामुळे भांडी चकचकीत आणि स्वच्छ होतील मीठ आणि लिंबाच्या रसामुळे भांडी क्लीन होल शिवाय दुर्गंधी दूर होईल.