Stinking Corpse Lily : जगभरातील सगळ्यात विचित्र फुल; कुजलेल्या प्रेतासारख्या दुर्गंधीमुळे सगळे राहतात दूर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Stinking Corpse Lily) जगभरात अनेक अशा गोष्टी आहेत ज्यांच्याविषयी जाणून आपल्याला आश्चर्य वा कुतूहल वाटते. तुम्ही अनेक सुंदर फुलं पाहिली असतील. वेगवेगळ्या जातीची, प्रजातीची, रंगांची फुल आपापल्या खास गुणांमुळे प्रसिद्ध असतात. एखाद फुल त्याच्या सुंदरतेमुळे तर एखाद फुल त्याच्या सुंगंधामुळे सर्वत्र लोकप्रिय असत. पण आज आपण ज्या फुलविषयी माहिती घेत आहोत त्या फुलाचा सुगंध नव्हे तर दुर्गंध त्याला सगळ्यांपेक्षा वेगळा बनवतो. या फुलाचे नाव आहे रॅफलेसिया अर्नोल्डी. ज्याचा दुर्गंध कुजलेल्या प्रेतासारखा येतो. चला या विचित्र फुलाविषयी जाणून घेऊया.

कुठे आढळतं हे फुल? (Stinking Corpse Lily)

आपल्या दुर्गंधीमुळे सर्वत्र चर्चेत असलेले रॅफलेसिया अर्नोल्डी हे विचित्र फुल इंडोनेशियात आढळत. अत्यंत दुर्मिळ आणि विचित्र फुलांपैकी एक म्हणून हे फुल ओळखलं जात. दिसायला हे फुल फारच वेगळे आणि आकर्षक असले तरीही त्याचा वास मात्र अतिशय घाणेरडा असतो. त्यामुळे लोक या फुलापासून शक्य तेव्हढे अंतर राखतात.

जगातील सर्वात महाकाय फुल

इंडोनेशियाच्या वर्षावनात ट्रेकिंग करताना एका ट्रेकरला दिसून आलेलं हे जगातील सर्वात मोठे फूल असल्याचे म्हटले जाते. अत्यंत महाकाय असे हे फूल सुगंधी नसून अत्यंत दुर्गंधी आहे. (Stinking Corpse Lily) या फूलाची उंची साधारण ३ फुटांपर्यंतही असते. तर या फुलाचे वजन १५ पौंड इतके असू शकते. या फुलात लाल आणि गुलाबी रंगाचा समावेश आहे. तर त्याच्या पाकळ्यांवर सफेद डाग आहेत. यामुळे हे फुल दिसायला आकर्षक आहे. मात्र, याची दुर्गंधी क्षणात बेशुद्ध पाडेल अशी आहे.

कुजलेल्या प्रेतासारखी दुर्गंधी

इंडोनेशियात आढळणारे रॅफलेसिया अर्नोल्डी हे फुल अत्यंत विचित्र असून त्याचा वास फारच घाणेरडा आहे. एखाद्या कुजलेल्या प्रेताप्रमाणे या फुलाचा वास येतो. मुख्य म्हणजे या फुलातून येणारी दुर्गंधी इतकी जास्त असते की, कित्येक किलोमीटरपर्यंत ही दुर्गंधी पसरते. त्यामुळे फार अंतरावर हा दुर्गंध आला की, आसपास हे फुल असणार याची खात्री पटते. (Stinking Corpse Lily) दिसायला महाकाय असणारे हे फुल इतर कोणत्याही फुलांपेक्षा फार वेगळे दिसून येते. मात्र त्याची दुर्गंधी त्याच वेगळेपण जवळून न्याहाळायची संधी देत नाही. विशेष म्हणजे. या फुलाची दुर्गंधी इतकी जास्त विचित्र आहे की, माणसं सोडाच जनावरंदेखील या गुळाच्या जवळ जात नाहीत.