Kitchen Tips : घरात आपण आपल्या कुटुंबासोयाबत राहत असतो असे जरी आपल्याला वाटत असले तरी आपण आपल्या घरात एकटे नसतो. घरात उपद्रव करणाऱ्या कीटकांचा वावर असतोच असतो. त्यातही मुंग्या म्हणजे बापरे…! सहजासजी निघून न जाणाऱ्या कितीही स्वच्छता केली तरी वारंवार येणाऱ्या लाल, काळ्या मुंग्या अगदी नकोशा वाटतात. अन्नपदार्थ , तेलकट पदार्थ जरा जरी फरशीवर सांडला तरी मुंग्या लागल्याच म्हणून समजा. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला मुंग्यांना पळवण्यासाठी सरळ साधे घराच्या घरी करता येण्याजोगे उपाय सांगणार (Kitchen Tips) आहोत चला तर मग जाणून घेऊया…
काळी मिरी (Kitchen Tips)
मसाल्याचा पदार्थ म्हणून अन्नपदार्थांमध्ये वापरली जाणारी काळी मिरी ही घरातल्या मुंग्या पळवण्यासाठी उत्तम मानले जाते. घरात जिथे जिथे मुंग्या दिसतील तिथं काळी मिरची पावडर शिंपडा. याशिवाय वाटलेली लाल मिरची सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता ज्यामुळे (Kitchen Tips) मुंग्या लवकर मरतील आणि पडतील शिवाय पुन्हा येणार नाहीत.
खडू (Kitchen Tips)
उपद्रव करणाऱ्या मुंग्यांना घालवायचा असेल तर खडू हा मुंग्यांना पळवण्यासाठी उत्तम ठरतो. ज्या ज्या ठिकाणी मुंग्या फिरतात अशा ठिकाणी खडू फिरवा खास करून अशा ठिकाणी गोल बनवा जिथे सर्कल मधून मुंग्या बाहेर (Kitchen Tips) येणार नाहीत.
व्हिनेगर
एक प्रकारचे आम्ल असलेले व्हिनेगर हे घरातल्या वस्तूंची स्वच्छता करण्यासाठी , अन्नपदार्थ बनवण्यासाठी शिवाय मुंग्यांना पळवून लावण्यासाठी उत्तम उपाय आहे. यासाठी एका स्प्रे बॉटलमध्ये विनेगर भरून ते मुंग्यांवर शिंपडा. घरातील दरवाजे खिडक्या आणि फरशीवर तुम्ही व्हाईट व्हिनेगर (Kitchen Tips) लावू शकतात त्यामुळे मुंग्या येणार नाहीत.
मिंट (Kitchen Tips)
मिंट म्हणजेच पुदिना हा सर्रास सगळ्या घरांमध्ये वापरला जातो. चटणी बनवण्यासाठी तर पुदिन्याचा वापर हा आवर्जून केला जातो. मात्र पुदिनाचा गंध हा स्ट्रॉंग असल्यामुळे पुदिनाचा वापर हा मुंग्यांना पळवून लावण्यासाठी होऊ शकतो. पुदिनाचे (Kitchen Tips) पाणी उकळून याचे थेंब इसेन्शियल ओईल थेंब आणि एक कप पाण्यात मिसळून मुंग्यांवर फवारा यामुळे मुंग्यांपासून सुटका मिळेल.
लिंबू
लिंबू मध्ये सायट्रिक ऍसिड असते त्यामुळे मुंग्यांपासून सुटका मिळवण्यासाठी लिंबू हा परिणामकारक ठरतो. यासाठी लिंबाचे साल ज्या ठिकाणी मुंग्या येतात त्या ठिकाणी ठेवा मुंग्या लिंबाच्या गंधामुळे दूर पळून जातील लिंबाचा रसही तुम्ही मुंग्यांवर (Kitchen Tips) शिंपडू शकता काही आंबट पदार्थ मुंग्यांना अजिबात आवडत नाहीत.