Kitchen Tips : घरातल्या प्रत्येक किचनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तवे वापरलेले असतात. हल्ली नॉनस्टिक आणि ऍनोडईज्ड तव्यांची भारी क्रेज आहे. मग चपाती , भाकरी, डोसा, ऑम्लेट आणि भाजी परतण्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या पॅन आणि तव्यांचा वापर होत (Kitchen Tips) असतो. मात्र वारंवार गरम होत असल्याने आणि तेलाच्या वापरामुळे तवा एकदम काळाकुट्ट (Kitchen Tips)होतो. मग हा तवा साफ करण्यासाठी मोठी मेहनत करावी लागते. मात्र आजच्या लेखात आम्ही अशी एक ट्रिक सांगणार आहोत ज्यामुळे तुमचा काळाकुट्ट तवा एकदम चकचकीत होऊन निघेल. केला तर मग जाणून घेऊया …
यासाठी आपल्याला आंघोळीसाठी वापरला जाणारा साबण वापरावा लागेल. आंघोळीच्या साबणाचा अशा पद्धतीने वापर तुम्ही शक्यतो कधी केला नसेल. काळपट तवा स्वच्छ (Kitchen Tips) करण्यासाठी आंघोळीचा साबण उपयुक्त ठरतो.
अशा प्रकारे करा कृती (Kitchen Tips)
- आधी तवा गॅसवर ठेवून गरम करून घ्या.
- गॅस चालू असतानाच तव्यात अंघोळीचा साबण किसून टाका.
- यात पाणी ओता. मग यात बेकिंग सोडा किंवा खाण्याचा सोडा आणि व्हिनेगर टाका. व्हिनेगरऐवजी तुम्ही लिंबाचा रसही वापरू शकता.
- आता हे मिश्रण पाच मिनिटं उकळायचं आहे आणि ढवळत राहायतं आहे.
- मिश्रण ढवळण्यासाठी शक्यतो लाकडाचा चमचा वापरा जेणेकरून तुमचा तवा खराब होणार नाही.
- हळूहळू मिश्रण आटत जाते. तव्यावर ते नीट पसरलेलं असते . आता हा तवा नीट स्वच्छ धुवून घ्या. शेवटी तुम्ही परिणाम पाहा.
- अंघोळीचा साबण लावण्याआधीचा तवा आणि अंघोळीचा साबण लावल्यानंतरचा तवा यात बराच फरक दिसतो.
तुम्ही पाहिले असेल रोजच्या वापरानंतर तवे किंवा नॉनस्टीक काळपट (Kitchen Tips) होतात. त्याच्या कडेने एक जाडसर काळा थर जमा होतो. हा थर पदार्थामार्फत आपल्या पोटात जाण्याची शक्यता असेत. यामुळे आपण आजारी पडण्याचा धोका असतो. पण अंघोळीचा साबण त्यावर लावल्याने हा काळपटपणा सहज निघाला. तुम्हाला तो चमच्यावरही दिसून येईल.