Kitchen Tips : फ्रिज म्हणजे रोजच्या वापरातील महत्वाची वस्तू आहे. आपण फ्रीजचा वापर दररोज करतो. पदार्थ दीर्घकाळ टिकवण्यासाठी फ्रिजची भूमिका महत्वाची आहे. आपण बऱ्याचदा फ्रिज आतून व्यवस्थित आणि वारंवार साफ करतो मात्र फ्रिजचा रबर तितका स्वच्छ केला जात नाही. त्यामुळे कालांतराने फ्रीजचा रबर कला पडतो. अनेकदा चिकट होऊन त्यावर बुरशी देखील चढते. म्हणूनच आम्ही (Kitchen Tips) आजच्या लेखामध्ये फ्रीजचा रबर साफ करण्याचा एक फंडा सांगणार आहोत चला तर मी जाणून घेऊया…
फ्रीज च्या आत मध्ये तापमान ज्या पद्धतीने सेट केलेले असते त्या पद्धतीने ते टिकवण्याचे काम हे फ्रीच्या असलेल्या डोअर वरच्या रबरचं असतं. त्यामुळे हे रबर साफ करताना अगदी काळजीपूर्वक आणि हळुवार करावे (Kitchen Tips) लागेल.
- फ्रिजचे रबर साफ करत असताना सगळ्यात आधी फ्रीजचा मेन स्विच बंद करून घ्या.
- त्यानंतर एका वाटीमध्ये लिक्विड डिश वॉश, विनेगर आणि बेकिंग सोडा (Kitchen Tips) हे तीन पदार्थ टाका
- फ्रिज चा रबर आधी पाणी लावून थोडं ओलसर करून घ्या.
- त्यानंतर आपण वाटीमध्ये तयार केलेला मिश्रण त्यावर टाका आणि तीन ते चार मिनिटे हे मिश्रण तसंच राहू द्या
- त्यानंतर आपल्याला वायरची घासणी घ्यायची आहे आणि हे रबर हलक्या हाताने घासून घ्या. तारेचा चोथा अजिबात वापरू नका. नाहीतर रबरला चरे पडू शकतात.
- आता पुन्हा एकदा त्यावर पाणी शिंपडा आणि रबर मऊ कापडाने (Kitchen Tips) व्यवस्थित पुसून घ्या