Kitchen Tips : पावसाळ्यात कितीही स्वच्छता केली तरी माशा करतात हैराण ? झटपट करा ‘हे’ उपाय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Kitchen Tips : पावसाळा हा ऋतू सर्वांना हवाहवासा वाटतो. निसर्गाचे देखणे रूप सर्व मरगळ दूर करून टाकते. पण पावसाळा अनेक आजार देखील घेऊन येतो. या आजारांचे वाहक म्हणजे पावसाळ्यात हमखास उद्भवणाऱ्या माशा आणि डास. पावसाळयात कितीही स्वच्छता केली तरी घरात माशांचा शिरकाव होतोच. म्हणूनच आम्ही आजच्या लेखात तुम्हाला अशा (Kitchen Tips ) काही टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे घरात माशांचा शिरकाव होणार नाही. शिवाय माशा घरातून निघून जातील. ह्या ट्रिक्स एका यु ट्यूब चॅनल वर प्रसारित करण्यात आल्या आहेत. चला तर मग जाणून घेऊया …

मिरचीचा स्प्रे (Kitchen Tips )

पावसात उद्भवणाऱ्या माशा आणि डास यांना पळवून लावण्यासाठी घरगुती उपायांमधला हा एक चांगला उपाय आहे. मिरचीचा स्प्रे तुम्ही तयार करून माशा आणि डास पळवू शकता. मिरचीचा स्प्रे हा तीव्र गंधाचा असतो त्यामुळे डास आणि माशा (Kitchen Tips ) घरात प्रवेश करत नाही आणि घरात असलेल्या माशा देखील बाहेर पळ काढतात. यासाठी एका स्प्रे बॉटलमध्ये लाल तिखट आणि पाणी घालून मिक्स करा ज्या ठिकाणी माशा आहेत त्या ठिकाणी ते शिंपडा. पण घरात लहान मुले आणि आजारी मंडळी असतील त्यांच्यापासून हा स्प्रे दूर ठेवा.

आल्याचा स्प्रे (Kitchen Tips )

जिंजर म्हणजेच आलं. आलं सुद्धा स्ट्रॉंग असतं. शिवाय त्याचा गंधही तिखट असतो. जर तुम्ही घरामध्ये जिंजर स्प्रे वापरला तर घरात माशा राहत नाहीत. यासाठी एका स्प्रे बॉटलमध्ये चार चमचे आल्याची पेस्ट घाला त्यानंतर चार कप पाणी मिसळा ज्या ठिकाणी माशांचा (Kitchen Tips ) वावर जास्त आहे त्या ठिकाणी हा स्प्रे करा.

कापूर (Kitchen Tips )

कापराचा गंध इतका तीव्र असतो की माशा या गंधामुळे पळून जातात. हा उपाय करण्यासाठी कापराचे गोळे बारीक करून त्याची पावडर तयार करा त्यानंतर पाण्यात मिसळा. तयार पाणी हे स्प्रे बॉटलमध्ये भरा आणि जिथे जिथे माशा दिसतील तिथे स्प्रे करा म्हणजे माशा (Kitchen Tips ) पळून जातील

ॲपल साइडर विनेगर

एप्पल साइडर विनेगर चा वापर खाद्यपदार्थांमध्ये केला जातो. याचा वापर तुम्ही माशांना पळवून लावण्यासाठी सुद्धा करू शकता. यासाठी एका स्प्रे (Kitchen Tips ) बॉटलमध्ये कपभर एप्पल साइडर विनेगर घाला. त्यामध्ये निलगिरीचे तेल घाला आणि मिक्स करा. हा तयार स्प्रे स्वयंपाक घरात स्प्रे करा यामुळे माशा सहज पळून जातील.