Kitchen Tips : दुधाला येईल घट्ट, मुठ्ठ साय, तूपही निघेल सुरेख ; वापरा काही सोप्या टिप्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Kitchen Tips : अनेकदा गृहिणींची तक्रार असते की दुधाला साय येत नाही. अनेक गृहिणी बाहेरील भेसळयुक्त तूप खाण्यापेक्षा घरीच बनवलले तुप खाणे पसंत करतात. मात्र जर दुधाची साय चांगली निघाली तरच तूप चांगले येते. म्हणूनच आम्ही आजच्या लेखात दुधावरील साय घट्ट येण्यासाठी काही टिप्स सांगणार आहोत. चला तर मग (Kitchen Tips) जाणून घेऊया…

दुधातील फॅट (Kitchen Tips)

खरेतर दुधाला साय येणे हे त्याच्यामध्ये असलेल्या फॅट च्या प्रमाणावर अवलंबून असते. त्यामुळे बाजारातून दूध खरेदी करताना जास्त फॅट असलेले दूध खरेदी करा. म्हशीच्या दुधाला गायीच्या दुधाच्या तुलनेत जास्त फॅट असते.

ताजे दूध वापरा (Kitchen Tips)

दुधाला घट्ट साय यायची असेल तर मलाई काढण्यासाठी नेहमी ताज्या दुधाचा वापर करावा. ताज्या दुधाला घट्ट साय येते.

दूध उकळणे

एका रिपोर्टनुसार दुधाला साय किती येणार हे तुम्ही कोणतं दूध वापरता यावर अवलंबून असतं दूध उकळल्यानंतर ते घट्ट होण्यास मदत होते तुम्ही जास्त काही येण्यासाठी दूध गरम झाल्यानंतर थोडा वेळ मंद आचेवर दूध उकळू द्या आणि नंतर गॅस बंद करा. हे दूध थंड करून फ्रीजमध्ये ठेवून द्या अर्ध्या तासाने या दुधावर जाड साय तयार झालेली दिसून येईल दूध एकदा उकळवल्यानंतर संध्याकाळी जेव्हा तुम्ही पुन्हा फ्रीजमधून बाहेर (Kitchen Tips) काढाल तेव्हा दुधावरची साय एका भांड्यात काढून घ्या.

त्यानंतर दूध गरम करून पुन्हा फ्रीजमध्ये ठेवा दुसऱ्यांदा ठेवलेल्या दुधाला खूप पातळ असा थर येईल. साय जमा करण्यासाठी एका स्वच्छ भांड्याचा वापर करा साय काढून ठेवल्यानंतर ही बंद डब्यातच ठेवा फ्रिजमध्ये झाकण न ठेवता साय ठेवल्यास (Kitchen Tips) त्यावर बुरशी येऊ शकते रोज दूध गरम केल्यानंतर त्याच डब्यात किंवा भांड्यात साठवत राहा

जाळीदार झाकणाचा वापर करा

दुधाला घट्ट साई येण्यासाठी मंद आचेवर काही वेळ दूध उकळू द्या तू त्याला उकळी आल्यानंतर लगेच गॅस बंद करू नये. थोडा वेळ उकळल्यानंतर गॅस बंद करा जेणेकरून साय जाड होईल. दूध उकळल्यानंतर थंड करण्यासाठी ठेवून द्या. यासाठी तुम्ही जाळीच्या झाकणाचा वापर करू शकता. दुधाच्या भांड्यावर जाळीचं झाकण ठेवल्यास दूध लवकर रूम टेंपरेचर वर येते आणि साय जाड येते