Kitchen Tips | आपल्या भारतीय जेवनामध्ये चपाती, भात वरण-भाजी अशा सगळ्या गोष्टी लागतात. तरच आपले जेवण पूर्ण होते. परंतु चपाती बनवणे जरा किचकट काम आहे. सकाळी घाई गडबडीत कामाला जायच्या वेळी चपात्या करायला खूप वेळ लागतो. परंतु आता सकाळी काम लवकर आवरण्यासाठी तुम्ही चपात्या करण्यासाठी काही सोप्या ट्रिक(Kitchen Tips) वापरू शकता. ज्यामुळे अगदी कमीत कमी वेळेमध्ये तुमचं हे काम पूर्ण होईल.
अशातच आता एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. ज्या व्हिडिओमध्ये तुम्हाला चपात्या करण्यासाठी काही सोप्या ट्रिक सांगण्यात आलेल्या आहेत. त्याच ट्रिक आपण जाणून घेणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला चपात्या करताना जास्त अडचणी येणार नाही.
चपात्या करताना सगळ्यात आधी एका भांड्यात गव्हाचे पीठ घ्या. त्यात थोडे पाणी घालून ते पातळ करा. अगदी आपण डोश्यासाठी जसं पीठ करतो. त्याच पद्धतीने पीठ करा आणि गॅस चालू करून त्यावर तवा ठेवा.
हा तवा तापल्यावर त्याच्यावर पीठ टाका. त्यानंतर चपाती तयार झालेली दिसेल. ही चपाती दोन्ही बाजूंनी नीट भाजली जाईल याची काळजी घ्या. अशा प्रकारे तुम्ही पीठ न मळताना, न लाटता ही चपाती बनवू शकता.
ज्यावेळी तुम्हाला चपाती बनवण्यामध्ये एक्सपर्ट नसता. त्यावेळी तुम्हाला पीठ मळताना विशेष काळजी घ्यावी लागते. कारण की पीठ जास्त कडक किंवा जास्त लूज असू नये. आणि पीठ मिळण्यासाठी गरम पाणी किंवा तुपाचा वापर करू शकता. पीठ मळल्यानंतर तुम्ही सुती कापड घ्या आणि प्लेटमध्ये काही वेळ झाकून ठेवा त्यामुळे पीठ चांगलं मुरेल.
गोल गोल चपाती करण्यासाठी चपाती गोल करा. त्यावर सुख पीठ लाटून तयार करून गेल्यानंतर चपाती हलक्या हाताने लाटून घ्या. फुगलेली मऊ चपाती करण्यासाठी जास्त पातळ करू नका. अशा प्रकारे तुम्ही तीन ते चार वेळा ही चपाती फिरवून फिरवून शिकून घ्या. अशाप्रकारे तुम्हाला चपाती करण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही.