Kitchen Tips : किचनमधील सिंक ही दरोरोज वापरली जाणारी गोष्ट आहे. भाजी, फळे धुणे , भांडी घासणे, अशी कामे तिथे सतत होतच असतात. आपल्या घरात कधी कमी तर कधी जास्त स्वयंपाक होत असतो. भाज्य चिरलेल्या, ओट्यावर (Kitchen Tips)सांडलेल्या गोष्टी आपोआपच सिंक मध्ये ढकलल्या जातात. त्यामुळे छोटे छोटे कण हे सिंक मध्ये जमा होतात. पाईपमध्ये जाऊन अडकतात त्यामुळे सिंक तुंबते. त्यातून सहजासजी पाणी जात नाही.
विशेषतः अपार्टमेंट मध्ये कॉमन नळ असल्यामुळे सिंक तुंबल्याची प्रकरणे वारंवार घडतात. पाईपमध्ये अडकलेल्या (Kitchen Tips) घाणीमुळे कुजून वास येतो मग असे अस्वछ सिंक म्हणजे डोकेदुखी ठरतात. आजच्या लेखात आपण हे सिंक घराच्या घरी साफ करण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स आणि टिप्स जाणून घेणार आहोत.
१) उकळलेलं पाणी (Kitchen Tips)
तुंबलेल्या सिंक मध्ये उकळलेले पाणी टाका. हे पाणी तुम्हाला हळू हळू सिंक मध्ये टाकायचे आहे. एक मोठे भांडे पाणी टाकून झाल्यानंतर थोडा गॅप घ्या आणि त्यानंतर पुन्हा उकळलेले पाणी टाका. जर सिंकच्या पाईपमध्ये तेलकटपणा असेल तर तो देखील या उपायामुळे दूर होण्यास मदत होणार आहे.
२) बेकिंग सोडा आणि व्हिनेगार
सर्वप्रथम अर्धा ते एक कप व्हिनेगार आधी सिंक मध्ये ओता
त्यानंतर तेवढ्याच प्रमाणात बेकिंग सोडा सिंकमध्ये ओता.
यानंतर १०/१५ मिनिटांनी सिंकमध्ये गरम पाणी ओता
यामुळे सिंक मधील चिवट चिकट घाण निघून जाईल.
सिंक स्वच्छ ठेवण्यासाठी टिप्स (Kitchen Tips)
- सर्वप्रथम सिंकमध्ये खरकटे टाकू नका आपल्या घरातला ओला कचरा वेगळा करा.
- सिंकमध्ये घाण जाऊ नये याकरिता सिंकची जाळी घ्या
- अधूनमधून सिंकमध्ये प्लेट ठेऊन पूर्ण सिंक पाण्याने भरा नंतर प्लेट काढून टाका. पाण्याच्या प्रेशर ने पाइपमधील घाण निघून जाईल.
- तूप, लोणी, केक अशा पदार्थांची भांडी धुताना (Kitchen Tips) गरम पाण्याचा वापर आवश्य करा.
- सिंक साफ करण्यासाठी ब्लॉक घालवण्यासाठी बाजारात पावडर मिळते ती देखील वापरू शकता.