Kitchen Tips : सध्याच्या धावपळीच्या जगात जॉब आणि घर सांभाळताना गृहिणींची तारेवरची कसरत होते. त्यातही स्वयंपाक करायचा म्हंटल्यावर किमान १ तास जातोच जातो. भाज्या धुवा, निवडा, चिरा आणि मग वाटण करून भाजी बनवा ह्या गोष्टी खप वेळ खाऊ असतात. पालेभाज्या निवडून ठेवू शकतो. पण इतर भाज्या चिरून ठेवल्या तर त्या खराब होतात. म्हणूनच आजच्या लेखात आम्ही चिरलेल्या भाज्या फ्रिजमध्ये जास्त काळ (Kitchen Tips) टिकवण्याच्या टिप्स सांगणार आहोत जेणेकरून तुमच्या भाज्या बिनधास्त 4-8 दिवस ताज्या टिकून राहू शकतात.
- चिरून ठेवलेल्या भाज्या टिकून ठेवायचे असतील ताज्या ठेवायच्या असतील तर त्या धुऊ नका. चिरलेल्या भाज्या पाण्यामध्ये धुवून फ्रीजमध्ये ठेवल्या तर त्या कुजू शकतात. त्यामुळे भाज्या कापल्या गेल्या असतील तर त्या न धुता झिप लॉक मध्ये ठेवा. आपण कोणतीही भाजी करताना आधी भाजी धुवून घेतो मात्र तुम्हाला ते टिकून ठेवायचे असेल तर ती भाजी धुवून घ्या (Kitchen Tips) चांगल्या कापडाने स्वच्छ कोरडी करा आणि नंतर चिरून ती तुम्ही जिप लोक करून फ्रीजमध्ये ठेवू शकता.
- बटाटा, वांग यासारख्या भाज्या कापल्यानंतर त्यांना हलक्या हाताने तेल लावा तसं केल्याने या भाज्यांना हवा लागणार नाही. याच्या (Kitchen Tips) मदतीने भाजी खराब होण्यापासून वाचू शकता पण तिचा ताजेपणाही टिकून राहतो.
- फ्रिज मधल्या भाज्या ह्या कुजण्याचं महत्त्वाचं कारण जर भाज्या ओल्या झाल्या त्यांना मॉइश्चुर आलं तर ह्या भाज्या कुजण्याची प्रोसेस सुरू होते. त्यामुळे बॅक्टेरिया आणि बुरशींची वाढ होऊ लागते म्हणूनच भाज्या कोरड्या ठेवणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे चिरलेल्या भाज्या नीट वाळवा आणि डबा, टिशू किंवा टॉवेल न पुसून टाका अतिरिक्त ओलावा सुकवण्यासाठी कंटेनरच्या तळाशी टिशू पेपर ठेवता येतो आणि त्यावर झाकण (Kitchen Tips) ठेवून वाळलेल्या भाज्या ठेवा.
- भोपळा, फणस यासारख्या भाज्या कापल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवायच्या असतील तर आधी त्यावर आंबट रस किंवा लिंबाचा रस घाला. त्यामुळे भाजी फार काळात खराब होणार नाही आणि त्यांचा ताजेपणा (Kitchen Tips) कायम राहील.
- चिरलेल्या भाज्या स्टोअर करायच्या असतील तर एअर टाईट कंटेनरचा वापर करा. असं केल्याने चिरलेल्या भाज्या खुल्या हवेच्या संपर्कात येणार नाहीत. पण ह्या माझ्या कंटेनर मध्ये ठेवताना बॉक्समध्ये कापड किंवा टॉवेल ठेवायला विसरू नका. कारण भाजीचा ओलावा त्यामुळे शोषला जाईल आणि भाजी खराब होणार नाही.
- चिरलेल्या भाज्या स्टोअर करताना टोमॅटो हा इथलीन वायू सोडत असतो. म्हणून तुम्ही त्यांना पालेभाज्या कोबी, गाजर, ब्रोकोली इत्यादी भाज्यांपासून (Kitchen Tips) वेगळाच ठेवा.