Kitchen Tips : भारतीय आहार पद्धतीमध्ये दुधापासून बनवलेल्या अनेक पदार्थांचा समावेश केला जातो. रोजच्या जेवणात दही, ताक, तूप, दूध अशा पदार्थांचा समावेश असतोच. त्यातही तूप हे भारतीय भोजन परंपरेतील महत्वाचा घटक मानला जातो. रोज एक चमचा तुपाचे सेवन केल्याने आरोग्यास अनेक फायदे होतात. लहान मुलांच्या आहारात आवर्जून तुपाचा समावेश केला जातो. मात्र घराच्या घरी तूप बनवण्यापेक्षा बाजारातील उपलब्ध तूप खरेदी करण्याकडे अनेकांचा कल असतो. या बाहेरील तुपात विविघ घटकांची भेसळ केली जाते. त्यामुळे आजच्या लेखात आम्ही सोप्या पद्धतीने तूप कसे बनवता येईल याची माहिती घेणार आहोत.
पहिली पद्धत (Kitchen Tips)
- सगळ्यात आधी दुधाला चांगली उकळी आल्यानंतर त्याची साय एका भांड्यामध्ये काढून घ्या.
- पुढचे आठवडाभर किंवा चार दिवस दुधाची साय दररोज एकाच भांड्यामध्ये साठवून ठेवा. हे भांड तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलात तरी चालेल. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे साठवलेली साय खराब होणार नाही.
- त्यानंतर जेव्हा आपल्याला तूप काढायचा आहे (Kitchen Tips) त्या दिवशी सकाळी लवकर तुम्ही फ्रीजमधून हे साईचं भांड काढून ठेवा. त्यामुळे साय ही नॉर्मल कंडिशनला येईल.
- साय साठवलेले भांडे नॉर्मल झाल्यानंतर हे भांड गॅसवर मंद आचेवर तापण्यासाठी ठेवा.
- पुढे या भांड्यात सतत एक चमचा हलवत रहा.
- त्यामुळे मलई खाली चिकटणार नाही आणि हळूहळू तूप मलाई पासून वेगळे होईल.
- त्यानंतर गाळणीच्या सहाय्याने तूप गाळून घ्या.
दुसरी पद्धत (Kitchen Tips)
- तूप बनवण्याची दुसरी एक पद्धत म्हणजे बटर पासून देखील तूप बनवता येते.
- त्यासाठी आधी फुल फॅट असलेले दूध घ्या.
- फुलफॅट दूध एका मिक्सरच्या भांड्यात फिरवून घ्या.
- मिक्सरला फिरवताना यात बर्फाचे तुकडे टाका बर्फानी थंड पाण्याने दूध फेकल्यानंतर वेगळं होतं बटर वेगळे झाल्यानंतर त्यात पुन्हा थोडा बर्फ टाकून घ्या. जास्तीत जास्त दूध निघून जाईल फक्त लोणी उरेल.
- त्यानंतर हे लोणी गॅसवर बारीक आचेवर कापून घ्या तूप तयार झाल्यावर ते पूर्णपणे थंड होऊ द्या आणि गाळणीच्या साह्याने गाळून एका काचेच्या बाटलीमध्ये (Kitchen Tips) भरून ठेवा.