Kitchen Tips : पीनट म्हणजे शेंगदाणे हे खाण्यासाठी खूप पौष्टिक असतात. त्यामध्ये जीवनसत्वे असतात. एवढेच नाही तर तुम्ही शेंगदाणे आणि काजू यांची तुलना केली तर शेंगदाण्यामध्ये सुद्धा काजू इतकेच पोषकतत्व आढळतात. म्हणूनच त्याला गरिबांचा मेवा असे म्हंटले जाते. सध्या नाश्ता करण्याच्या प्रकारामध्ये पीनट बटर सॅन्डविच हा प्रकार खूप लोकप्रिय आहे. हे पीनट बटर घराच्या घरी तुम्ही (Kitchen Tips) शेंगदाण्यापासून बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊया घरी कसे बनवायचे पीनट बटर ?
साहित्य (Kitchen Tips)
शेंगदाणे, मीठ, दालचिनी, मध किंवा साखर
कृती
पीनट बटर तयार करण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला (Kitchen Tips) शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे भाजले की ते थंड होऊ द्या. त्यानंतर त्याची साल काढून घ्या. त्यानंतर हे शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यात टाका त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि दालचिनीचे (Kitchen Tips)दोन तीन तुकडे टाकायचे आहेत. जर हे पीनट बटर तुमच्या घरामध्ये तुमच्या बच्चे कंपनीला द्यायचं असेल तर तुम्ही मध किंवा साखर हे दोन गोड होण्यासाठीचे ऑप्शन त्यामध्ये टाकू शकता. मात्र पीनट बटर गोड नको असेल तर त्यामध्ये ह्या दोन्ही प्रकार घालू नका. आता हे सर्व मिश्रण मिक्सरमध्ये वाटून घ्या.
जोपर्यंत या पूर्ण मिश्रणाला एक क्रीमी टेक्सचर येत नाही तोपर्यंत हे मिश्रण तुम्हाला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने तयार होईल झटपट तुमचं होममेड पिनट बटर (Kitchen Tips)