किचन मध्ये काम करीत असताना मिक्सर चा वापर सर्रास केला जातो. पण अनेकदा हा मिक्सर वापरून वापरून इतका घाण होऊन जातो की त्याचा रंगच बदलून जातो. अशा मिक्सरचे चिकट चिवट आणि तेलकट डाग काढणे म्हणजे डोकेदुखी होऊन जाते. आजच्या लेखात आपण अशा चिवट मिक्सरच्या भांड्यांचे डाग डाग कसे साफ करायचे ? चला जाणून घेऊया…
कोमट पाण्याचा वापर करा
मिक्सरच्या भांड्यात थोडं कोमट पाणी टाका आणि त्यात 2 चमचे लिक्विड डिश सोप घाला. झाकण लावून मिक्सरला 30 सेकंद चालवा. यामुळे चिकट मसाले आणि डाग सैल होतील. आणि भांडे स्वच्छ होईल.
लिंबाचा वापर
कोमट पाण्यात लिंबाचा रस टाका आणि त्यात चिमूटभर मीठ मिसळा. हे पाणी मिक्सरमध्ये फिरवा. लिंबामुळे दुर्गंधी दूर होईल आणि मिक्सर स्वच्छ दिसेल.
बेकिंग सोडा वापरा
अडलेल्या डागांसाठी, मिक्सरच्या भांड्यात बेकिंग सोडा आणि थोडं पाणी टाकून मिक्सर फिरवा. बेकिंग सोडा मजबूत डाग काढण्यात मदत करतो.
व्हिनेगर
अर्धा कप पाण्यात 2 चमचे व्हिनेगर घाला आणि मिक्सर चालवा. व्हिनेगरने चिकटपणा आणि दुर्गंधी दूर होईल.
ब्रशचा वापर करा
मिक्सरचे ब्लेड किंवा कोपरे स्वच्छ करण्यासाठी जुन्या टूथब्रशचा वापर करा. तो ब्लेडच्या अवघड भागांमध्ये पोहोचतो आणि घाण सहज काढतो.
सुकवणे महत्त्वाचे
मिक्सर धुतल्यानंतर त्याला चांगलं सुकवायला विसरू नका. ओलसर भागांमुळे बुरशी होऊ शकते.
हे सोप्पे उपाय वापरून तुमचा मिक्सर काही मिनिटांत स्वच्छ आणि चमकदार दिसेल!




