Kitchen Tips : तुमचे किचन ही अशी जागा आहे जिथे सर्वाधिक सफाईची आवश्यकता असते. किचनमध्ये तेलाचा वापर होत असल्यामुळे किचनमध्ये टाइल , खिडक्या , एक्झॉस्ट फॅन , किचनमधील (Kitchen Tips) स्विच बोर्ड, डबे अशा सगळ्या भागांवर तेलकट चिवट असा थर जमा होतो. आता हे चिकट चिवट तेलाच्या फोडणीचे डाग काढायचे म्हणजे मोठी मेहनत घ्यावी लागते. म्हणून आजच्या लेखात आम्ही तुम्हाला असे काही ट्रिक्स सांगणार आहोत ज्याने तुम्ही हे हट्टी,चिवट डाग सहज काढू शकता.चला तर मग जाणून घेऊया…
बेकिंग सोडा
भिंती आणि टाइल्स वरील हे चिकट डाग घालवण्यासाठी बेकिंग सोडा हे उत्तम साधन ठरू शकते. यासाठी बेकिंग सोडा घ्या त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करा आणि त्याची पेस्ट बनवा (Kitchen Tips) ही पेस्ट डागांवर लावा आणि नंतर ही पेस्ट सुकू द्या. त्यानंतर पुन्हा एकदा साफ आणि सुकलेल्या कपड्याने हळूहळू हे डाग घासून साफ करा.
पांढरी टूथपेस्ट
पांढरे टूथपेस्ट केवळ दात चमकवण्यासाठी नव्हे तर भिंतीवरचे तेलाचे डाग (Kitchen Tips)काढण्यासाठी खूप फायदेशीर ठरते. भिंतीवरचे तेलकट चिवट डाग घालवण्यासाठी या डागांवर काही वेळ पांढरी टूथपेस्ट लावून ठेवा त्यानंतर ओल्या कपड्याने पुसून टाका.
बेबी पावडर
बेबी पावडर ही तेल ओढून घेण्यामध्ये मदत करते. भिंतीवरचे तेलकट डाग काढण्यासाठी बेबी पावडर त्यावर शिंपडा काही तास ते तसंच राहू द्या आणि त्यानंतर एका साफ कपड्याने हे पावडर पुसून घ्या.
व्हिनेगर
व्हिनेगर एक ऍसिड आहे जे तेल स्वच्छ करण्यास मदत करते. पाण्यात व्हिनेगर मिसळून द्रावण तयार करा. हे द्रावण तेलाच्या डागावर टाका आणि काही मिनिटे राहू द्या. यानंतर ओल्या कपड्याने डाग स्वच्छ करा.
लिंबू + राख + व्हिनेगर
राख, लिंबू आणि व्हिनेगरची पेस्ट हट्टी तेलाच्या डागांना हटवण्यासाठी फायदेशीर आहे. ही पेस्ट डागावर लावा आणि काही मिनिटे चोळा. यानंतर ओल्या कपड्याने डाग स्वच्छ करा.