Kitchen Tips : उन्हाळयाच्या दिवसात दही, ताक, मठ्ठा अशा पदार्थांचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप हितकारक मानले जाते. घरचे दही असेल तर मग अशा पदार्थांची लज्जत आणखीच वाढते. पण पारंपारिक पद्धतीने दही लावणे म्हणजे जवळपास ८ तासांचा कालावधी जातो. शिवाय विरजणच नसेल तर दही लागणार कसे ? हाही मोठा प्रश्न असतोच म्हणूनच आम्ही दही लावण्याच्या काही ट्रिक्स (Kitchen Tips) घेऊन आलो आहोत ज्यामुळे दही विर्जनशिवाय लागते चला तर मग जाणून घेऊया…
हिरवी मिरची
पहिली आणि एक सोपी पद्धत ही आहे की घरात असणारी हिरवी मिरची तुम्हाला दही लावण्यासाठी उपयोगी पडू शकते. मात्र या मिरचीला देठ असणं आवश्यक आहे. या प्रक्रियेसाठी सगळ्यात आधी दूध हलकं गरम (Kitchen Tips) करून घ्या त्यानंतर कोमट करून घ्या हे कोमटून दूध एका भांड्यामध्ये ठेवा आणि या गरम दुधात दोन हिरव्या मिरच्या घाला. या मिरच्या पूर्णपणे दुधात बुडाल्या पाहिजेत. त्यानंतर आहे दूध गरम ठिकाणी (Kitchen Tips) सहा तास झाकून ठेवा. दही विरजण न घालता सेट होईल.
लिंबाचा रस
लिंबाच्या रसापासून दही बनवण्यासाठी कोमट दूध घ्या त्यामध्ये दोन चमचे लिंबाचा रस पिळून घाला. त्यानंतर हे दूध (Kitchen Tips) झाकून सहा ते सात तास उबदार ठिकाणी ठेवा त्यामुळे चांगले दही लागते.
चांदीचे नाणे (Kitchen Tips)
चांदी म्हणजे पटकन रिऍक्ट होणारा धातू आहे. त्यामुळे चांदीचा वापर तुम्ही दही लावण्यासाठी करू शकता. याकरिता कोमट दुधात चांदीचे नाणे किंवा चांदीचे अंगठी टाकल्यानंतर सहा ते आठ तास कोमट दूध गरम जागी झाकून ठेवा दही बनवण्याचा (Kitchen Tips) हा सर्वात सोपा मार्ग आहे.
लाल मिरची
हिरव्या मिरची सोबत लाल मिरची सुद्धा घालून तुम्ही दही तयार करू शकता. आणि याकरिता दही बनवण्यासाठी कोमट दुधामध्ये सात ते आठ लाल मिरची भिजत ठेवा आणि स्वच्छ उबदार जागी ठेवा असे केल्याने दही (Kitchen Tips) चांगले लागते.
या गोष्टींची काळजी घ्या
- दही लावताना नेहमी फुल क्रीम दूध वापरा.
- दही लावताना दूध चांगले उकळून घ्यायचे आहेत त्यानंतर कोमट झाल्यानंतर सेट करायला वापरायचे आहे.
- दही सेट करत असताना त्याची क्रीम देखील वापरा.
- बऱ्याच वेळा दही लावल्यानंतर भांडे हलवल्याने दह्याला पाणी सुटते म्हणून भांडे एकदा ठेवल्यावर पुन्हा पुन्हा उचलू नका.