Kitchen Tips : आपल्या रोजच्या जेवणात असे काही पदार्थ असतात ज्याच्यामध्ये लासणाचा हमखास वापर केला जातो. एखाद्या पदार्थाची लज्जत वाढवण्यामध्ये लसणाचा मोठा वाटा असतो. पण लसूण सोलणे हा तितकाच कंटाळवाणा आणि वेळखाऊ प्रकार आहे. त्यामुळे आज आम्ही आजच्या लेखात अशा काही टिप्स (Kitchen Tips) सांगणार आहोत ज्यामुळे लसूण सोलण्याचा वेळ वाचणार आहे आणि पदार्थाची लज्जतही टिकून राहणार आहे चला तर मग जाणून घेऊया…
लोणचे
आपल्या भारतात लोणच्याचे अनेक प्रकार केले जातात. जेव्हा भाज्या नसतात तेव्हा तोंडी लावायला ही लोणची हमखास वापरली जातात. तुम्ही लसणाचे लोणचे बनवून त्याचा वापर एक साईड डिश म्हणून (Kitchen Tips) करू शकता.
लसूण हवेशीर जागी ठेवा
लसूण साठवण्यासाठी शक्यतो जाळीदार भांडे वापरा. जेणेकरून लसणाला हवा लागेल आणि तो खराब होणार नाही. जर साठवलेल्या लसणाला ओलेपणा आलाच तर मग बल्ब चा वापर करून त्याला उष्णता देऊन पुन्हा सुकवू शकता.
लसूण पेस्ट (Kitchen Tips)
बाजारातून लसूण पेस्ट विकत घेण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी लसूण पेस्ट बनवून केव्हाही पदार्थांमध्ये वापरू शकता. फ्रिज (Kitchen Tips) मध्ये ठेवल्यावर ही लसूण पेस्ट बराच काळ टिकते.
लसणाची गोठवण प्रक्रिया
लसूण जर जास्त काळ टिकवून ठेवायचा असेल तर तुम्ही एका एअर टाईट कंटेनर मध्ये लसूण ठेऊन फ्रिजरला फ्रीझ करून ठेऊ शकता. बरेच (Kitchen Tips) महिने हा लसूण टिकतो.
तळलेला लसूण
तुम्ही बऱ्याचदा सोशल मीडियावर पहिले असेल लसूण फ्राय करून ठेवला जातो. त्यापध्दतीनेच (Kitchen Tips) लसूण डीप फ्राय करून ठेऊ शकता.