Kitchen Tips : उन्हाळयाच्या दिवसात तापमानात मोठी वाढ होत असते. त्यामुळे त्याचा आपल्या शरीरावर जसा परिणाम होतो त्याचप्रमाणे इतर पदार्थांवर सुद्धा त्याचा परिणाम होत असतो. किचनच्या बाबतीत बोलायचे झाल्यास किचनमधील अन्नपदार्थ उन्हाळ्यात लवकर खराब होतात. इतर अन्नपदार्थांबरोबर दूध देखील वारंवार उन्हाळयात नासते. म्हणूनच आजच्या लेखात आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे उन्हाळ्यात दूध नासण्याची (Kitchen Tip) समस्या कमी होईल. चला तर मग जाणून घेऊया…
फॉलो करा ‘या’ टिप्स (Kitchen Tip)
- उन्हाळ्यामध्ये अनेक पदार्थ लवकर खराब होत असल्यामुळे फ्रिजमध्ये ठेवले (Kitchen Tip) जातात. मात्र उन्हाळ्यात जर लोड शेडींग मुळे बराच वेळ लाईट गेली तर फ्रिज मधील दूध आपण बाहेर काढल्यास हमखास नासते.
- जर तुम्ही दूध फ्रिजमध्ये ठेवत नसाल तर ते दिवसातून ३ ते ४ वेळा गरम करा.
- तुम्ही ज्या भांड्यात दूध तापवता ते भांडे वेगळेच असू द्या इतर कोणताही पदार्थ त्यामध्ये ठेऊ नका.
- दूध गरम करून झाल्यानंतर ते थंड होण्यासाठी थोडा वेळ (Kitchen Tip) बाजूला ठेवा.
- जर दुधात चिमटभर सोडा टाकला तर तर ते नसण्याचे प्रमाण कमी होते.