IPL 2020 : दिनेश कार्तिकने कर्णधारपद सोडलं ; ‘या’ आक्रमक फलंदाजाकडे सोपवलं कोलकात्याच नेतृत्व

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कर्णधार दिनेश कार्तिकने [dinesh kartik ]कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या कर्णधार पदाचा राजीनामा दिला असून इंग्लडचा स्टार फलंदाज आयन मॉर्गन [ion morgan ]कडे कोलकात्याचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. कोलकात्याच्या संघ व्यवस्थापनाने याबाबत माहिती दिली आहे

दिनेश कार्तिकने केकेआर व्यवस्थापनाला माहिती दिली आहे की, फलंदाजीवर लक्ष केंद्रित करून संघाच्या कार्यात अधिक योगदान द्यावे या उद्देशाने त्याने इयन मॉर्गनकडे [ion morgan ] कर्णधारपद सोपवावे अशी इच्छा व्यक्त केली आहे.

दिनेश कार्तिकने घेतलेल्या निर्णयाचा आम्ही सन्मान करतो आणि असा निर्णय घेण्यासाठी खूप मोठं धैर्य असावं लागते. त्याच्या या निर्णयामुळे आम्हाला आश्चर्य वाटले तरी आम्ही त्याच्या इच्छेचा आदर करतो. तसेच इंग्लंडचा विश्वविजेता कर्णधार आयन मॉर्गन जो यापूर्वी संघाचा उपकर्णधार होता तो आता संघाचं नेतृत्व करणार आहे हे आमचं भाग्यच आहे असे कोलकाता नाइट रायडर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी वेंकी म्हैसूर यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

कोलकाता नाईट रायडर्सची यंदाच्या आयपीएल मधील कामगिरी साधारण राहिली असून प्ले ऑफ मध्ये पोचण्यासाठी त्यांना बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे. आता इंग्लिश कर्णधार आयन [ion morgan ] मॉर्गनच्या नेतृत्वाखाली संघाचं नशीब बदलतंय का ते पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment