KKR vs SRH Final : कोण होणार IPL चॅम्पियन? पीच रिपोर्ट, Playing XI कशी असेल?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैद्राबाद मध्ये आयपीएलचा अंतिम सामना (KKR vs SRH Final) रंगणार आहे. चेन्नई येथील एम चिदंबरम स्टेडियममध्ये आयपीएल फायनलचा थरार रंगणार असून क्रिकेटप्रेमी मोठ्या आतुरतेने या अंतिम सामन्याची वाट बघत आहेत. संध्याकाळी 7:30 वाजता सामना सुरु होणार असून क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा रंगतदार आणि रोमांचक सामन्याची अपेक्षा आहे. आजच्या या अंतिम सामन्यात कोणत्या संघाचे पारडं जड असेल? खेळपट्टी कोणाला साथ देईल? आणि दोन्ही संघाची Playing XI कशी असेल? याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात …..

कोणाची ताकद जास्त ? KKR vs SRH Final

दोन्ही संघाचा नीट अभ्यास केल्यास टॉप ऑर्डरची आक्रमक फलंदाजी हीच दोघांची मुख्य ताकद आहे. सनरायजर्स हैद्राबादकडे अभिषेक शर्मा आणि तट्रेव्हिस हेड असे २ आक्रमक सलामीवीर आहेत जे कोणत्याही मैदानावर गोलंदाजाच्या चिंधड्या उडवण्याची क्षमता राखतात. दोन्ही डावखुरे फलंदाज डावाच्या पहिल्या चेंडूपासून गोलंदाजांवर तुटून पडलेलं आपण बघितलं आहे. यामुळेच मॅचच्या सुरुवातीपासून प्रतिस्पर्धी संघावर हैद्राबाद वरचढ ठरत आली आहे. मात्र जेव्हा जेव्हा हे दोन्ही सलामीवर लवकर बाद होतात तेव्हा तेव्हा हैद्राबादचा डाव कोसल्याचे सुद्धा आपण बघितलं आहे. या दोघांव्यतिरिक्त एडन माक्रम आणि हेन्री क्लासेन संघाच्या मदतीला आत्तापर्यंत धावून आलेत. तर गोलंदाजीमध्ये कर्णधार पॅट कमिन्स, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार आणि फिरकीपटू शहाबाज अहमद यांच्यावर हैदराबादची भिस्त असेल.

दुसरीकडे, कोलकाता नाईट रायडर्सबाबत सांगायचं झाल्यास, केकेआर कडे सुद्धा सुनील नारायण आणि रहमतुल्ला गुरबाज यांच्यारूपाने आक्रमक सलामीवीर आहेत. सुनील नारायण तर कोलकात्याच्या आत्तापर्यंतच्या यशाचा हिरो आहे. पहिल्या चेंडूपासून चौकार- षटकारांची आतषबाजी करत नारायण समोरच्या गोलंदाजांना अक्षरशा घायाळ करत आहे. याशिवाय मधल्या फळीत कर्णधार श्रेयश अय्यर, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग आणि आंद्रे रसेल सारखे फलंदाज संघासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. गोलंदाजीमध्ये मिचेल स्टार्क, वरून चक्रवर्ती, हर्षित राणा आणि सुनील नारायण केकेआरला आणखी मजबूत करतात.

हेड टू हेड निकाल कसाय –

कोलकाता आणि हैदराबाद यांनी आतापर्यंत एकमेकांविरुद्ध 27 आयपीएल सामने खेळले आहेत. त्यापैकी KKR ने 18 जिंकले आहेत तर SRH ने 9 सामन्यात विजय मिळवला आहे. या मोसमात हे दोन्ही संघ दोनदा भिडले.या दोन्ही सामन्यात कोलकात्याच्या हैद्राबादचा पराभव केला आहे.

पीच रिपोर्ट काय सांगतो?

चेपॉक हे नेहमीच त्याच्या संथ खेळपट्टीसाठी ओळखले जाते, जे फिरकीपटू आणि स्लो गोलंदाजांना मदत करते. हैद्राबादकडे शहाबाज अहमद आणि अभिषेक शर्मा असे २ फिरकीपटू आहेत ज्यांनी क्वालिफायर सामन्यात राजस्थान फलंदाजांना रोखलं होते. तर कोलकात्याकडे वरून चक्रवर्ती आणि सुनील नारायण अशी २ मुख्य अस्त्रे आहेत त्यामुळे फिरकीपटूंच्या कामगिरीवर दोन्ही संघाचा विजय अवलंबून असेल. स्पर्धेचा अंतिम टप्पा (KKR vs SRH Final) असल्याने मैदान थोडं संथ झालं असेल. मात्र टिकून फलंदाजी केल्यास मोठी धावसंख्या उभारणे सोप्प होईल.