हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या काळात credit card चा वापर करणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. बँकांकडून त्यावर देण्यात येणाऱ्या ऑफर्समुळे हे घडत आहे. बँकांडून क्रेडिट कार्डवर अनेक प्रकारचे डिस्काउंट दिले जातात. याबरोबरच क्रेडिट कार्डवर उपलब्ध असलेल्या ईएमआयच्या सुविधेमुळे खरेदी करणे देखील सुलभ झाले आहे. क्रेडिट कार्डद्वारे करण्यात येणाऱ्या खरेदीवर 3, 6, 9 आणि 12 महिन्यांसाठी EMI सुविधा मिळते. याशिवाय कार्डवरील एकूण खरेदी बिलाचे पेमेंट अंशतः किंवा हप्त्यानेही करता येते. मात्र EMI चा पर्याय सोयीचा वाटत असला तरी हा पर्याय निवडण्यापूर्वी काही गोष्टींची माहिती घेतली पाहिजे. कारण ईएमआयसाठी बँकांकडून असे काही चार्जेस लावले जातात ज्याकडे सहसा आपल्याकडून लक्ष दिले जात नाही.
फी आणि इतर चार्जेसबाबत जाणून घ्या
credit card वर उपलब्ध असलेल्या EMI च्या सुविधेवर अतिरिक्त शुल्क द्यावे लागते. जसे कि व्याज, प्रोसेसिंग फीस, प्री-पेमेंट/ फोरक्लोजर चार्जेस इ. मात्र EMI साठी फक्त एकदाच प्रोसेसिंग फीस आकारली जाईल, जी एकूण रकमेच्या 3 टक्के असेल. तसेच जेव्हा आपल्याला कर्जाचे हप्ते वेळेवर बंद करायचे असतील तेव्हा फोरक्लोजर/प्रीपेमेंट चार्जेस आकारले जातात. त्याच वेळी, credit card देणाऱ्या संस्थेकडून ईएमआयवर व्याज आकारले जाते. मात्र, नो कॉस्ट EMI वर, हे चार्जेस माफ केले जातात किंवा इतर सवलतींच्या तुलनेत एडजस्ट केले जातात.
योग्य कालावधीची निवड करा
हे लक्षात घ्या कि, सामान्यतः दीर्घ कालावधीसाठीचा व्याजदर कमी असतो. मात्र पेमेंटसाठीची टर्म निवडण्यापूर्वी, त्या संपूर्ण कालावधीसाठी द्यावे लागणाऱ्या व्याजाचे कॅल्क्युलेशन करणे आवश्यक आहे. समजा आपल्याला 10,000 रुपयांचा ईएमआय करायचा असेल. यामध्ये 3 महिन्यांच्या कालावधीसाठी 20 टक्के व्याजदर तर 12 महिन्यांसाठी हा दर 18 टक्के असेल. अशात जर आपण कमी दर म्हणजे 18 टक्के निवडत असू तर यासाठी जास्त पैसे द्यावे लागतील. कसे ते जाणून घ्या….
3 महिन्याच्या EMI प्लॅनवरील व्याज : रु 493.15 [10,000*(20%/365)*90]
12 महिन्यांच्या EMI प्लॅनवरील व्याज : रु 1,800 [10,000*(18%/365)*365]
हे लक्षात घ्या कि, अल्पावधीसाठीचा व्याजदर जास्त असला तरी यामध्ये परतफेडीची रक्कम कमी असते. तर दुसरीकडे, 12 महिन्यांच्या ईएमआयवर जास्त व्याज द्यावे लागेल. credit card
रिवॉर्ड पॉइंट्स, कॅशबॅक आणि डिस्काउंट द्वारे होणारे नुकसान
credit card देणारी संस्था साधारणपणे कोणतेही रिवॉर्ड पॉइंट्स किंवा ईएमआयमध्ये कन्व्हर्ट केलेल्या ट्रान्सझॅक्शनवर अतिरिक्त सवलत देत नाहीत. अशा परिस्थितीत, नेहमी रिवॉर्ड पॉइंट्स/कॅशबॅकच्या कारणास्तव होणाऱ्या नुकसानीचे मूल्य विचारात घेतले पाहिजे किंवा जर ईएमआय कन्व्हर्टचा पर्याय निवडला नसेल तर त्यावर उपलब्ध असलेल्या सवलती तपासल्या पाहिजेत. जर नॉन-ईएमआय खरेदीवर ऑफरद्वारे चांगली बचत होत असेल, तर ईएमआयचा पर्याय निवडण्यापूर्वी पुन्हा विचार करायला हवा.
EMI वर क्रेडिट लिमिट ब्लॉक
जेव्हा आपण credit card वर EMI निवडतो तेव्हा एकूण ट्रान्सझॅक्शनची रक्कम आपल्या क्रेडिट लिमिट मधून वजा केली जाते. मात्र, EMI भरत असताना, ही रक्कम आपल्यासाठी उपलब्ध लिमिटमध्ये जोडली जाईल. जेव्हा आपण खरेदीला EMI मध्ये कन्व्हर्ट करतो, तेव्हा त्या वेळी कार्डवरील लिमिट कमी होते आणि जेव्हा EMI पूर्ण भरतो. नंतर संपूर्ण क्रेडिट लिमिट पुन्हा दिली जाते.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.hdfcbank.com/personal/pay/cards/credit-cards
हे पण वाचा :
Personal Loan साठी अर्ज करण्यापूर्वी ‘या’ 4 गोष्टी लक्षात ठेवा !!!
‘या’ Multibagger Stock ने गेल्या 1 वर्षात गुंतवणूकदारांवर पडला पैशांचा पाऊस !!!
Divi’s Laboratories Limited च्या शेअर्सने गेल्या 19 वर्षांत गुंतवणूकदारांना बनवले कोट्यधीश
Bank Holiday : सप्टेंबर महिन्याच्या उरलेल्या दिवसांत बँका 5 दिवस राहणार बंद, सुट्ट्यांची लिस्ट तपासा
FD Rates : खाजगी क्षेत्रातील ‘या’ बँकेने FD वरील व्याजदरात केली पुन्हा वाढ, नवीन दर तपासा