Signal अ‍ॅपवर WhatsApp Group ट्रान्सफर करायचाय? तर पाहा, ‘ही’ सोपी पद्धत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । जगभरात WhatsApp च्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीवर नाराजी व्यक्त केली जात आहे. नवीन प्रायव्हसी पॉलिसीचा चांगलाच फटका WhatsApp ला बसताना पाहायला मिळत आहे. या नवीन पॉलिसीमुळे गोपनीयतेचा भंग होत असल्याने अनेक युझर्स WhatsApp सोडून सिग्नल आणि टेलिग्राम यांसारख्या अ‍ॅपकडे वळले आहेत. WhatsApp च्या प्रायव्हसी पॉलिसीचा प्रचंड फायदा Signal आणि Telegram ला झाला आहे.

अल्पावधीत या दोन्ही अ‍ॅपच्या युझर्सची संख्या कोट्यवधीने वाढली. यातच व्हॉट्सअ‍ॅपला मागे टाकत भारतातील आघाडीचे फ्री अ‍ॅप बनल्याची माहिती सिग्नल अ‍ॅपने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन दिली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये कोट्यवधी युझर्सनी व्हॉट्सअ‍ॅपला रामराम केला आहे. आता व्हॉट्स अ‍ॅप सोडून सिग्नल अ‍ॅपवर गेलेल्या युझर्सना मात्र आपला व्हॉट्सअ‍ॅपचा डेटा कसा ट्रान्सफर करायचा, असा प्रश्न पडला आहे. या चिंतेत तुम्हीही असाल, तर WhatsApp चे ग्रुप Signal अ‍ॅपवर ट्रान्सफर कसे करावेत, याबाबत आता आपण माहिती घेऊ.

१) सर्वप्रथम गुगल प्ले-स्टोअरवरुन Signal अ‍ॅप डाउनलोड करून इन्स्टॉल करा.

२) यानंतर सिग्नल अ‍ॅपवर एक ग्रुप क्रिएट करा. यात किमान एका व्यक्तीला अ‍ॅड करा.

३) पुढे Signal अ‍ॅपच्या ग्रुप सेटिंग्समध्ये जाऊन Group link पर्यायावर टॅप करा.

४) पुढची स्टेप म्हणजे ग्रुप लिंकवर टॉगल ऑन करून Share पर्यायावर टॅप करा. तुम्हाला एक ग्रुप लिंक येईल.

५) यानंतर, आता व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप चॅट ओपन करा आणि ग्रुप लिंक पोस्ट करा.

६) या पोस्ट केलेल्या लिंकला अ‍ॅक्सेस करणारा कोणताही वापरकर्ता अ‍ॅडमिनच्या परवानगीनंतरच Signal ग्रुपमध्ये चॅटिंग करू शकतो.

७) विशेष म्हणजे अ‍ॅडमिन कधीही ही लिंक बंद करू शकतो. यासंदर्भातील माहिती सिग्नल अ‍ॅपच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून देण्यात आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment