पोस्टाच्या या जबरदस्त योजनेत करा गुंतवणूक; दरमहा मिळतील 9,250 रुपये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी सरकारकडून अनेक विविध योजना राबवल्या जातात. अशीच एक योजना आहे जी पोस्ट ऑफिसकडून राबवण्यात येते. या योजनेचे नाव आहे मासिक उत्पन्न योजना (Masik Utpanna Yojana). या योजनेमध्ये पैसे गुंतवल्यानंतर तुम्हाला काही कालावधीनंतर नियमित उत्पन्न मिळून जाईल. तसेच याचा भविष्यात देखील तुम्हाला सर्वात जास्त फायदा होईल. ही योजना नक्की काय आहे याचा फायदा काय होईल आपण जाणून घेऊया.

मासिक उत्पन्न योजना

पाच वर्षांच्या मॅच्युरिटी कालावधीसाठी तुम्ही मासिक उत्पन्न योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतात. या योजनेअंतर्गत तुम्ही एकाच वेळी 9 लाख रुपये गुंतवू शकता. तर संयुक्त खात्यामध्ये 15 लाखांपर्यंत गुंतवणूक करू शकता. तुम्ही जर 15 लाखांची गुंतवणूक केली तर तुम्हाला दरमहा 9,250 रुपये देण्यात येतील. तसेच नऊ लाख रुपये गुंतवल्यास दर महिन्याला 5,550 रुपये मिळून जातील. खास म्हणजे या योजनेसाठी तुम्ही तीनजण मिळून खाते उघडू शकता.

महत्वाचे म्हणजे मासिक उत्पन्न योजनेत तुम्ही एक हजार रुपयांपासून ते नऊ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. त्याचबरोबर जॉईंट अकाउंट काढल्यास पंधरा लाखांपर्यंत गुंतवणूक करू शकतात. यावर सरकार तुम्हाला दरवर्षी 7.4% दराने व्याज देईल. परंतु तुम्ही जर 5 वर्षांच्या मॅच्युरिटी अगोदर पैसे काढले तर त्यातून एक टक्के रक्कम कापली जाईल. त्यामुळे या योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही सर्व गोष्टींचा विचार करा.