नवी दिल्ली । नाशिक येथील करन्सी नोट प्रेस प्रत्यक्षात देशाच्या सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत येते. देशभरात या कॉर्पोरेशनचे 09 युनिट्स आहेत. नाशिकमध्ये त्यांचे दोन युनिट्स आहेत. एक युनिट करन्सी नोटा प्रिंट करते तर दुसरे युनिट स्टॅम्प पेपर, रेवेन्यू टिकिट, पासपोर्ट आणि व्हिसा इत्यादी प्रिंट करते. या सर्वांमध्ये इतकी मोठी सिक्युरिटी असते की या परिसरात प्रवेश करत असताना आणि निघतानाही जबरदस्त तपासणी केली जाते. बर्याच पातळीवर अशा प्रकारे तपासणी केली जाते की, आपण गुपचूपपणे प्रेसच्या बाहेर काहीही घेऊन जाऊ शकत नाही.
नाशिक करन्सी प्रेस मुंबईपासून 188 किमी अंतरावर आहे. 1928 मध्ये येथेच ब्रिटिश काळात पहिल्यांदा नोट छापण्याची मशीन बसविण्यात आली. यानंतर भारतात करन्सी छापणे सुरू झाले. येथे चान्गल्या क्वालिटीच्या नोटा छापल्या जातात. नाशिकचे प्रेस हे भारतातील एक असे छपाईचे प्रेस देखील आहे, जिथे नेपाळ, भूतान, बर्मा, बांगलादेश, पूर्व आफ्रिका आणि इराक या देशांच्या करन्सीही छापल्या गेल्या.
नाशिकचा प्रिंटिंग प्रेस 14 एकरांमध्ये पसरली आहे. यासह, येथे एक हाय सिक्युरिटी प्रिंटिंग कॉम्प्लेक्सही आहे, ज्यामध्ये कर्मचार्यांसाठी रेसिडेन्शिअल कॉम्प्लेक्स देखील आहे. येथे आपल्याला आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट उपलब्ध आहे. यासाठी कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही.
या करन्सी नोट प्रेसचे युनिट इटाग्लिओ प्रिंटिंग मशीनसह डिझायनिंग, मायनिंग, कम्पोझिट प्रिंटिंग आणि ऑफसेट प्रिंटिंग, नंबरिंग आणि फिनिशिंग मशीन सारख्या सुविधांनी सुसज्ज आहे. हे ISO 9001:2000 & ISO 14001:2004 सर्टीफाइड यूनिट्स आहेत. करन्सी संदर्भात सर्व प्रकारचे काउंटिंग आणि सिक्युरिटी सिस्टीम आहे.
करन्सीच्या आधुनिक डिझाईनवर करता येणारी सर्व प्रकारची कामे, येथील मशीनद्वारे केली जातात. येथे करन्सी आणि रेव्हेन्यू स्टॅम्प इत्यादी अशा तांत्रिक कल्पनेद्वारे बनविल्या जातात की ते बाहेरून कुठेही प्रिंट केले जाऊ शकत नाहीत, म्हणूनच बाहेर छापलेल्या बनावट नोटा लगेचच पकडल्या जातात, कारण त्यामध्ये त्या सर्व लॉक्स आणि तरतुदी नसतात, जे इथे केले जातात. या युनिट्स देखील अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशा आहेत. कारण अनेक परदेशी देशांच्या नोट्सदेखील पूर्वी येथेच छापल्या जात असत.
नोटबंदीनंतर नाशिकमधून देशभरात सर्वाधिक नोटा छापल्या गेल्या आहेत. त्यावेळी ओव्हरटाईम काम केले जात होते. तेव्हा येथे एका दिवसात चार कोटींच्या नोटांचे प्रिंटिंग केले जात होते, ज्यामध्ये 500, 200, 100, 50, 20 आणि 10 अशा सर्व प्रकारच्या नोटा होत्या. इथे फक्त 2000 रूपयांची नोट छापली जात नाही कारण ती म्हैसूर आणि बंगालच्या साल्बोनी करन्सी प्रिंटिंग प्रेसमध्ये छापली जाते.
करन्सी नोट प्रेस नाशिक येथील उत्पादन स्थितीत सातत्याने सुधारणा झाली आहे. जरी कालांतराने इथल्या मशीन्सचे ऑटोमेशन चालू झाल्यामुळे कर्मचार्यांची संख्या कमी झाली तरीही सध्याच्या काळात येथे 2547 कर्मचारी काम करतात. नाशिकनंतर देशात अनेक ठिकाणी करन्सी आणि कॉईन छापण्याचे काम सुरू झाले, परंतु आजही नाशिकमध्ये नोटांच्या छपाईसह स्टॅम्प पेपर, पासपोर्ट आणि व्हिसा प्रिंटिंग हे सर्वात मोठे काम आहे. हा संपूर्ण परिसर हाय सिक्युरिटी झोनमध्ये येतो. सेंट्रल इंडस्ट्रियल फोर्सचे जवान नेहमीच येथे हजर असतात. जे केवळ परिसराचे रक्षणच करत नाहीत तर करन्सी कोठेही पाठव्हायचे कामही सक्रियपणे करतात.