Wedding Insurance म्हणजे काय ??? त्याचे फायदे जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Wedding Insurance : कोरोनानंतर लोकं इन्शुरन्सबाबत खूपच सजग झाले आहेत. कोरोनाकाळापासूनच लोकं वेडिंग इन्शुरन्सही काढत आहेत. सध्याच्या काळात देशात लग्न करण्याच्या पद्धतीत झपाट्याने बदल होत आहेत. कोरोनामधील लॉकडाऊनमुळे अनेकांची लग्ने रद्द किंवा पुढे ढकलण्यात आली होती. लग्न रद्द झाल्याने वधू-वर या दोन्ही बाजूंना मोठे नुकसान सहन करावे लागले होते. आता काही विमा कंपन्यांनी लग्नातील नुकसान भरून काढण्यासाठी वेडिंग इन्शुरन्सची सुविधा सुरू केली आहे. चला तर मग यासंबंधित सर्व माहिती जाणून घेउयात…

Wedding Insurance: Check out expenses covered, premium and coverage  categories - India Today

लग्नासाठी मोठा खर्च

हे लक्षात घ्या कि, भारतात लग्नासाठी लोकांकडून मोठा खर्च केला जातो. अनेक लोकं आपल्या आयुष्याभराची बचत आपल्या मुलांच्या लग्नांवर खर्च करतात. सध्या देशभरात लग्नसराईचा हंगाम सुरू झाला आहे. एका मीडिया रिपोर्ट्स नुसार फेब्रुवारी 2023 पर्यंत भारतात लग्नांमध्ये सुमारे 3.75 लाख कोटी रुपये खर्च केले जातील असे सांगण्यात आले आहे. मात्र अनेकदा लग्न ठरलेल्या तारखेच्या आधी रद्द होते. ज्यामुळे लोकांना लाखोंचे नुकसान होते. अशा परिस्थितीत इन्शुरन्स कंपन्यांनी विवाह रद्द केल्यामुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी Wedding Insurance प्लॅन सुरू केले आहेत. यामध्ये चोरी किंवा विवाहसोहळ्यातील अन्य कोणत्याही प्रकारच्या अपघातामुळे होणारे नुकसान भरून काढले जाते.

Do You Need Wedding Insurance In India? - Goodreturns

Wedding Insurance बाबत जाणून घ्या

एका आकडेवारीनुसार, भारतात दरवर्षी सुमारे 1.5 कोटी विवाह होतात. या विवाहांमध्ये दरवर्षी 3 ते 4 लाख कोटी रुपये खर्च केले जातात. आपल्याकडे लग्नसमारंभात भरपूर खर्च करण्याची परंपरा आहे. यासाठी लग्नाच्या कित्येक महिने आधीपासूनच बँड वाद्ये, लग्नाचे ठिकाण, खरेदी आदींची तयारी सुरू होते. अशा परिस्थितीत लग्न रद्द झाल्याने खूप नुकसान होते. अशा प्रकारच्या नुकसानीपासून Wedding Insurance द्वारे संरक्षण मिळते.

Groom Arrives Late For Wedding; Annoyed Bride Finds Herself Another Man -  GoodTimes: Lifestyle, Food, Travel, Fashion, Weddings, Bollywood, Tech,  Videos & Photos

प्रीमियम कसा भरावा ???

Wedding Insurance खरेदी करण्यासाठी, लग्नात झालेल्या एकूण खर्चाच्या आधारे प्रीमियम भरावा लागतो. भारतात सध्या लग्न विम्याचा ट्रेंड फारसा जोरात नाही, पण काही वर्षांत तो खूप प्रसिद्ध होणार आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. लग्नाच्या विम्यामध्ये पॉलिसी खरेदी करण्यासाठी, लग्नावरील एकूण खर्चाच्या 1 ते 1.5 टक्के रक्कम प्रीमियम म्हणून भरावी लागते. समजा तुमच्या लग्नाला 15 लाखांचा खर्च येणार असेल तर तुम्हाला त्यातील 1 ते 1.5 टक्के प्रीमियम भरावा लागेल.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bankbazaar.com/miscellaneous-insurance/wedding-insurance.html

हे पण वाचा :
PIB fact Check : 500 रुपयांची ‘ही’ नोट खरी आहे की बनावट, अशा प्रकारे समजून घ्या
सेकंड हँड Swift खरेदी करण्यापूर्वी लक्षात ठेवा ‘या’ 5 महत्वाच्या गोष्टी
Atal Pension Yojana मध्ये पैसे जमा करता येत नसतील तर ताबडतोब करा ‘हे’ काम
Suryoday Small Finance Bank च्या FD वर मिळेल 9% पेक्षा जास्त व्याज
Kotak Mahindra Bank कडून ​​FD वरील व्याजदरात वाढ, नवीन दर तपासा