Kotak Mahindra Bank कडून ​​FD वरील व्याजदरात वाढ, नवीन दर तपासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Kotak Mahindra Bank: RBI कडून रेपो दरात आतापर्यंत 5 वेळा वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी व्याजदर वाढण्यास सुरुवात केली आहे. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ होऊ लागली आहे. यादरम्यानच, आता Kotak Mahindra Bank ने 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या FD वरील व्याजदरात बदल केला आहे. या बदलानंतर, बँक सामान्य नागरिकांना FD वर जास्तीत जास्त 6.50 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना जास्तीत जास्त 7 टक्के व्याज देत आहे.

Kotak Mahindra Bank Q2 net profit falls 7%, asset quality improves | Mint

9 डिसेंबर 2022 पासून नवीन दर लागू

Kotak Mahindra Bank च्या अधिकृत वेबसाइटवरील माहितीनुसार, हे नवीन दर 9 डिसेंबर 2022 पासून लागू होणार आहेत. या बदला नंतर आता बँक 7 ते 14 दिवसांच्या FD वर 2.75% व्याज देत आहे, तर 15 ते 30 दिवसांच्या FD वर 3% व्याज दिले जात आहे. 31 ते 45 दिवसांच्या FD वर आता बँकेने दिलेले व्याजदर 3.25% आणि 46 ते 90 दिवसांच्या FD वर 3.50% आहेत. 91 ते 120 दिवसांच्या FD वर आता 4% व्याज मिळेल, तर 121 ते 179 दिवसांच्या FD वर आता 4.25% व्याज मिळेल. 180 दिवस ते 270 दिवसांच्या FD वर आता 5.50% व्याजदर देत आहे आणि 271 दिवस ते 363 दिवसांच्या FD वर आता 5.75% व्याजदर देत आहे.

Kotak Mahindra Bank Q2 Results: Net Profit Rises 27%, Beats Estimates

Kotak Mahindra Bank च्या एफडीचे नवीन दर

Kotak Mahindra Bank आता आता 364 दिवसांच्या FD वर 6% आणि 365 दिवस ते 389 दिवसांच्या FD वर 6.25%, 390 दिवस ते 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठीच्या FD वर जास्तीत जास्त 6.50% तर 2 वर्ष ते 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठीच्या FD वर 6.40% व्याजदर मिळेल. त्याच प्रमाणे कोटक महिंद्रा बँक आता 3 वर्षे आणि त्याहून जास्त मुदतीच्या मात्र 4 वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या FD वर 6.30%, 4 वर्ष आणि त्याहून जास्त मुदतीच्या मात्र 5 वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या FD वर 6.25% आणि 5 वर्ष ते 10 वर्षांच्या मुदतीच्या FD वर 6.20% ऑफर देत आहे.

Fixed Deposit Interest Rate, Fixed Deposit Calculator, FD Calculator, FD Interest Rate, FD Interest Rate 2021 | Personal News – India TV

अनेक बँकांनी FD चे दर वाढवले ​​आहेत

अलीकडेच CSB बँक लिमिटेड, कोटक महिंद्रा बँक, RBL बँक, Axis बँकेकडूनही आपल्या FD दरांमध्ये वाढ केली गेली आहे. RBI ने रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांकडून ही दर वाढीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

Fear of lending, few borrowers — why banks are flooding RBI with funds for low returns

RBI कडून रेपो दरात वाढ

अलीकडेच, RBI ने डिसेंबरच्या धोरणात रेपो दरात आणखी 0.35 टक्क्यांनी वाढ आहे. या दरवाढीनंतर, रेपो दर आता 6.25 टक्क्यांवर पोहोचला आहे. किरकोळ चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून आक्रमक दरवाढीमुळे निर्माण होणाऱ्या दबावाला तोंड देण्यासाठी RBI कडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.kotak.com/en/personal-banking/deposits/fixed-deposit/fixed-deposit-interest-rate.html

हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे दर पहा
आता Yes Bank ची अनेक कामे Whatsapp वरच करता येणार, कसे ते समजून घ्या
Budget Cars : 10 लाखांच्या बजटमधील ‘या’ 5 उत्कृष्ट कार, फीचर्स अन् किंमत तपासा
आता Home Loan घेण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही, घरबसल्या सहजपणे मिळवा पैसे
वाईच्या ससाणेकडून माझी 20 लाखांची फसवणूक : अभिनेते सयाजी शिंदे